RCB vs KKR: बँगलोरच्या गोलंदाजांपुढे कोलकाताच्या फलंदाजांची दाणादाण

RCB vs KKR: बँगलोरच्या गोलंदाजांपुढे कोलकाताच्या फलंदाजांची दाणादाण

RCB ने KKR वर गोलंदाजांच्या जोरावर सहज विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सच्या ८५ धावांच्या छोटं लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ८ गडी राखून सहज पूर्ण केलं. प्रथम फलंदाजी करताना KKR चा डाव RCB च्या गोलंदाजांसमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली. या विजयासह RCB ने २ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली.

KKR च्या ८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना RCB च्या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात करून दिली. सलामीवीर फिंच आणि देवदत पडीकल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागादारी केली. सलामीवीरच सामना जिंकवतील असं वाटत असतानाच लॉकी फरफर्ग्युसनने फिंचला माघारी धाडत RCB ला पहिला धक्का दिला. त्यानंतर देवदत पडीकलही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि गुरकिरत मान यांनी अधिक जोखीम न घेता पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या सामन्यात RCB च्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. नाणेफेकीचा निर्णय घेत कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानावर आली. परंतू RCB च्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांपासूनच भेदक मारा करत KKR वर दडपण आणलं. मोहम्मद सिराजने अचूक मारा करत राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांना माघारी धाडलं. यानंतर KKR च्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. शुबमन गिल देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मैदानावर फटकेबाजी करु पाहणाऱ्या टॉम बँटनलाही सिराजने माघारी धाडत KKR समोरची अडचण अधिकच वाढवली. २० षटकांत KKR ला अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फॉर्मात असलेल्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. मोहम्मद सिराजने एकाच सामन्यात दोन षटकं निर्धाव टाकून ३ बळी घेत आयपीएलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली.

First Published on: October 22, 2020 12:08 AM
Exit mobile version