IPL 2021 Auction : जाणून घ्या आयपीएल लिलावाबाबत सर्व काही!  

IPL 2021 Auction : जाणून घ्या आयपीएल लिलावाबाबत सर्व काही!  

आयपीएल खेळाडू लिलाव 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमाआधीचा खेळाडू लिलाव (Auction) गुरुवारी पार पडणार आहे. २०२१ वर्षात आयपीएलचा मेगा लिलाव होणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला आपल्या योजनांमध्ये बदल करणे भाग पडले. त्यामुळे यंदा केवळ ‘मिनी लिलाव’ होणार आहे. असे असले तरी या लिलावात एकूण २९२ खेळाडूंवर बोली लागणार असून ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यासारख्या परदेशी खेळाडूंना कोणता संघ खरेदी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. मॅक्सवेल आणि स्मिथ हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू आहेत. परंतु, त्यांना आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे मॅक्सवेलला किंग्स इलेव्हन पंजाबने, तर स्मिथला राजस्थान रॉयल्सने संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या दोघांवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

दुपारी ३ वाजल्यापासून लिलाव

भारतीय खेळाडूंमध्ये केदार जाधव आणि ऑफस्पिनर हरभजन सिंग यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना कोणता संघ खरेदी करणार हे पाहणेही महत्वाचे ठरेल. या दोघांची मूळ किंमत २ कोटी इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच अष्टपैलू शिवम दुबे आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव या भारतीयांवरही मोठी बोली लागू शकेल. चेन्नईत होणाऱ्या या खेळाडू लिलावाला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.

संघांमधील रिक्त जागा 

मुंबई इंडियन्स 
शिल्लक रक्कम – १५.३५ कोटी
एकूण जागा रिक्त – ७
परदेशी खेळाडूंच्या जागा – ४

चेन्नई सुपर किंग्स 
शिल्लक रक्कम – १९.९० कोटी
एकूण जागा रिक्त – ६
परदेशी खेळाडूंच्या जागा – १

दिल्ली कॅपिटल्स
शिल्लक रक्कम – १३.४० कोटी
एकूण जागा रिक्त – ८
परदेशी खेळाडूंच्या जागा – ३

राजस्थान रॉयल्स 
शिल्लक रक्कम – ३७.८५ कोटी
एकूण जागा रिक्त – ९
परदेशी खेळाडूंच्या जागा – ३

किंग्स इलेव्हन पंजाब 
शिल्लक रक्कम – ५३.२० कोटी
एकूण जागा रिक्त – ९
परदेशी खेळाडूंच्या जागा – ५

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
शिल्लक रक्कम – ३५.४० कोटी
एकूण जागा रिक्त – ११
परदेशी खेळाडूंच्या जागा – ३

कोलकाता नाईट रायडर्स  
शिल्लक रक्कम – १०.७५ कोटी
एकूण जागा रिक्त – ८
परदेशी खेळाडूंच्या जागा – २

सनरायजर्स हैदराबाद 
शिल्लक रक्कम – १०.७५ कोटी
एकूण जागा रिक्त – ३
परदेशी खेळाडूंच्या जागा – १

लिलावात कोणत्या देशाचे किती खेळाडू?

एकूण खेळाडू – २९२; भारत – १६४, ऑस्ट्रेलिया – ३५, न्यूझीलंड – २०, वेस्ट इंडिज – १९, इंग्लंड – १७, दक्षिण आफ्रिका – १४, श्रीलंका – ९, अफगाणिस्तान – ७, नेपाळ – १, युएई – १, अमेरिका – १

 

First Published on: February 17, 2021 5:56 PM
Exit mobile version