IPL 2021 : कोणीही मला अनफिट म्हणू नये यासाठी प्रयत्नशील – धोनी

IPL 2021 : कोणीही मला अनफिट म्हणू नये यासाठी प्रयत्नशील – धोनी

महेंद्रसिंग धोनी

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने यंदाच्या आयपीएल मोसमाची चांगली सुरुवात करताना तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. मात्र, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीत अजून फारसे योगदान देता आलेले नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात त्याला १७ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. मात्र, धोनीला फार धावा करता आल्या नसल्या तरी ३९ व्या वर्षी त्याची फिटनेस पाहून चाहते फिदा झाले. त्याने धावचीत न होण्यासाठी डाईव्ह मारली आणि हे पाहून त्याचे कौतुक झाले. कोणीही मला अनफिट म्हणून नये यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सामन्यानंतर धोनी म्हणाला.

फिटनेस माझ्या हातात

तुम्ही जेव्हा या स्तरावर क्रिकेट खेळता, तेव्हा कोणीही तुम्हाला अनफिट म्हणू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करता. आमच्या संघात आता बरेच युवा खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत खेळण्यासाठी आणि त्यांना आव्हान देण्यासाठी मलाही फिटनेसवर विशेष लक्ष द्यावे लागते. तुम्ही प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करणारच असे नाही. मी जेव्हा २४ वर्षांचा होतो, तेव्हा चांगली कामगिरी करणारच हे खात्रीने सांगू शकत नव्हतो आणि आता ४० वर्षांचा झाल्यावरही सांगू शकत नाही. मात्र, फिटनेस माझ्या हातात आहे. कोणीही मला अनफिट म्हणू नये यासाठी मी प्रयत्नशील असतो, असे धोनी म्हणाला.

 

First Published on: April 20, 2021 10:13 PM
Exit mobile version