IPL 2021 : धोनी पुन्हा फेल; चर्चा मात्र त्याच्या डाईव्हवाल्या फिटनेसची

IPL 2021 : धोनी पुन्हा फेल; चर्चा मात्र त्याच्या डाईव्हवाल्या फिटनेसची

महेंद्रसिंग धोनी मारली डाईव्ह

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये सामना होत आहे. वानखेडेवर होत असलेल्या या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नईची प्रथम फलंदाजी आल्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनी कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. धोनीचा हा चेन्नईचा कर्णधार म्हणून २०० वा सामना होता. परंतु, या सामन्यातही तो फेल ठरला. त्याला १७ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. त्याला युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने बाद केले. मात्र, धोनीला फार धावा करता आल्या नसल्या तरी ३९ व्या वर्षी त्याची फिटनेस पाहून चाहते फिदा झाले.

फिटनेसवर चाहते फिदा

या सामन्यात धोनी १४ व्या षटकात फलंदाजीला आला. मात्र, पुढच्याच षटकात त्याला माघारी परतावे लागले असते. राहुल तेवातिया टाकत असलेल्या या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नॉन-स्ट्राईकवर असलेला जाडेजा ही धाव काढण्यासाठी उत्सुक नव्हता आणि त्याने धोनीला मागे पाठवले. धोनी जवळपास अर्ध्या पिचवर आला होता. मात्र, तो वेगाने पुन्हा मागे परतला आणि आपण क्रिजमध्ये पोहचू शकणार नाही हे कळल्यावर त्याने डाईव्ह मारली. त्यामुळे तो आऊट झाला नाही. त्याने डाईव्ह मारताना दाखवलेल्या फिटनेसवर चाहते फिदा झाले आणि त्यांनी सोशल मीडियावरून धोनीचे कौतुक केले.

First Published on: April 19, 2021 9:40 PM
Exit mobile version