IPL 2021 : रोहितला रन-आऊट करणे पडणार महागात? लिन म्हणतो…

IPL 2021 : रोहितला रन-आऊट करणे पडणार महागात? लिन म्हणतो…

रोहित शर्मा, क्रिस लिन

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सलामीच्या लढतीत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रोहित शर्मा मुंबई इंडियन्स (MI) संघावर मात केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर क्रिस लिनला मुंबईकडून पदार्पणाची संधी मिळाली. लिनला मागील वर्षीच्या खेळाडूला लिलावात मुंबईने खरेदी केले होते, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यंदा त्याला पहिल्याच सामन्यात संधी मिळाली आणि त्याने ४९ धावांची खेळी केली. मात्र, त्याच्यात आणि कर्णधार रोहितमधील ताळमेळ बिघडला. त्यामुळे रोहित धावचीत झाला. आता कर्णधाराला धावचीत करणे महागात पडणार नाही, अशी आशा असल्याचे लिन गमतीत म्हणाला.

सामन्यादरम्यान अशा गोष्टी घडतात

पहिल्याच सामन्यात कर्णधाराला धावचीत करणे योग्य नाही. मुंबईसाठी कदाचित हा माझा पहिला आणि अखेरचा सामना असू शकेल असे लिन गमतीत म्हणाला. सामन्यादरम्यान अशा गोष्टी घडतात. त्यामुळे या गोष्टीवर फार चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असेही लिनने सांगितले. पहिल्या सामन्यात क्विंटन डी कॉक खेळू न शकल्याने लिनला संधी मिळाली. त्याने या संधीचा चांगला फायदा घेत ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली.

First Published on: April 10, 2021 6:30 PM
Exit mobile version