IPL 2022 Mega Auction : लिलावाच्या तारखा जाहीर; फेब्रुवारीमध्ये या दिवशी लागू शकते खेळाडूंची बोली

IPL 2022 Mega Auction : लिलावाच्या तारखा जाहीर; फेब्रुवारीमध्ये या दिवशी लागू शकते खेळाडूंची बोली

IPL Auction 2022 : IPL खेळाडूंचे उद्यापासून मेगा ऑक्शन, कोणाला संधी?, वेळेसह खर्चाचीही माहिती

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. आयपीएल २०२२ पासून लीगमध्ये दोन नवीन संघाचा समावेश होणार आहे. त्यामुळे आगामी हंगामात संघाची संख्या ८ वरून १० होईल. दरम्यान नवीन हंगामासाठी मोठ्या प्रमाणात खेळाडूंचा लिलाव होईल ज्यामध्ये कित्येक स्टार खेळाडूंचा देखील समावेश असणार आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सांगितले की, इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा ऑक्शनचे आयोजन ७ आणि ८ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होईल. हा आयपीएलचा शेवटचा सर्वात मोठा लिलाव असू शकतो.

बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कोरोना महासाथीमुळे परिस्थिती बिघडली नाही, तर आयपीएल २०२२ चा लिलाव भारतात होईल. दोन दिवसीय लिलाव ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार असून, त्यासाठीची तयारी सुरू आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे वाढत असताना परदेशी प्रवासावर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे ते भारतात करणे अधिक सोपे होईल.”

लखनऊ आणि अहमदाबादचे नवीन संघ जे आयपीएलच्या पुढच्या हंगामापासून लीगमध्ये सामील होतील, त्यांच्याकडे इतर संघानी रिटेन न केलेल्या खेळाडूंपैकी तीन खेळाडूंना संघात घेण्यासाठी डिसेंबर अखेर वेळ देण्यात आला आहे. सीव्हीसीचा होकार मिळणे बाकी असल्याने बीसीसीआय त्यासाठी अतिरिक्त वेळ देऊ शकते.

दरम्यान दर तीन वर्षांनी लिलाव प्रक्रिया पार पडते तेव्हा त्याचा संघातील नियोजन पध्दतीवर परिणाम होतो असे काही संघांनी म्हटले होते. दिल्ली कॅपिटल्सचे संघाचे मालक पार्थ जिंदाल म्हणाले होते की, संघ तयार करण्यासाठी एवढी मेहनत केल्यानंतर खेळाडूंना काढून टाकणे खूप अवघड आहे.

First Published on: December 22, 2021 8:02 PM
Exit mobile version