दुखापतीमुळे IPL च्या बाहेर; एकही मॅच न खेळलेला चहर BCCI च्या निर्णयाने होणार मालामाल

दुखापतीमुळे IPL च्या बाहेर; एकही मॅच न खेळलेला चहर BCCI च्या निर्णयाने होणार मालामाल

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज दीपक चहर आयपीएलच्या १५ व्या (IPL 2022) हंगामाला मुकला आहे. दुखापतीमुळे चहर आयपीएलच्या बाहेर गेला आहे. चेन्नईने मेगा लिलावावेळी १४ कोटींची बोली लावून संघात घेतलं. परंतु, एवढा महागडा खेळाडू यंदा एकही सामना खेळू शकणार नाही. आयपीएलमधून बाहेर गेल्याने त्याला १४ कोटी मिळणार की नाही याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या (BCCI) एका निर्णयाने यंदा त्याचा खिसा रिकामा होणार नाही आहे.

बीसीसीआयने दीपक चहरला २०२१-२२ च्या हंगामात केंद्रीय करारात सामील करुन घेतलं आहे. याआधी चहर बीसीसीआयच्या करारात नव्हता. मात्र, त्याने गतवर्षी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला करारात सामील करुन घेतलं. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे चहरला फायदा होणार आहे. त्याला ज्या किंमतीमध्ये खरेदी केलं ती रक्कम त्याला पूर्ण मिळणार आहे. त्यामुळे एकही सामना न खेळता देखील चहरचा खिसा हा पूर्ण भरलेला असेल.

दरम्यान, दुखापती संदर्भातील नियम याआधीच करुन ठेवण्यात आला होता. २०११ साली आयपीएलमध्ये एक नवा नियम करण्यात आला, ज्यामध्ये बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील कोणताही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नाही; तर त्या खेळाडूला लिलावाद्वारे मिळालेली रक्कम विमा कंपनीद्वारे मिळणार. बीसीसीआय आपल्या केंद्रीय करारातील सर्व खेळाडूंचा वीमा काढत असते. एखादा खेळाडू जखमी झाल्याने त्या सत्रालामुकला तर त्याला बोर्ड वीम्याद्वारे रक्कम देईल. नियमानुसार करार झालेल्या खेळाडूची अर्धी रक्कम बीसीसीआय आणि उरलेली रक्कम फ्रँचायझी भरेल.


 

First Published on: April 18, 2022 10:29 AM
Exit mobile version