IPL Auction : हा ‘मिस्ट्री स्पिनर’ ठरला सर्वात महागडा खेळाडू; पंजाबने ८.४० कोटींमध्ये केले खरेदी

IPL Auction : हा ‘मिस्ट्री स्पिनर’ ठरला सर्वात महागडा खेळाडू; पंजाबने ८.४० कोटींमध्ये केले खरेदी

वरुण चक्रवर्ती

बाराव्या आयपीएल मोसमाआधी मंगळवारी खेळाडू लिलाव झाला. या लिलावात तामिळनाडूचा ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीला ८.४० कोटी इतकी मोठी रक्कम देत किंग्स इलेव्हन पंजाबने खरेदी केले. तर मागील आयपीएल लिलावाप्रमाणे या लिलावातही वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटवर मोठी बोली लागली. त्यालाही ८.४० कोटी रुपयांत राजस्थान रॉयल्सने पुन्हा आपल्या संघात घेतला. तर युवराज सिंगला कोणता संघ घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष होते. त्याला पहिल्या टप्प्यात कोणीही खरेदी केले नाही. पण दुसऱ्या टप्प्यात त्याला मुंबई इंडियन्सने त्याची मूळ किंमत १ करोडमध्येच खरेदी केले.

कोण आहे वरुण चक्रवर्ती ? 

८.४० कोटी मिळालेला वरुण चक्रवर्ती हा २७ वर्षीय तामिळनाडूचा खेळाडू आहे. तो १७ वर्षांचा होईपर्यंत यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळात होता. यानंतर त्याला कोणत्याही क्लबने खेळण्याची संधी न दिल्याने त्याने क्रिकेट सोडून आर्किटेक्चरच्या पदवीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पुन्हा वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पण मध्यंतरी त्याला दुखापत झाली आणि त्याने फिरकीपटू होण्याचा निर्णय घेतला. यावर्षी झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये वरुणने अप्रतिम कामगिरी केली होती. तर त्याने यावर्षी विजय हजारे चषकाच्या ९ सामन्यांत २२ विकेट घेतल्या. त्यामुळेच लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागली.

कोणी कोणाला खरेदी केले :

First Published on: December 19, 2018 3:00 AM
Exit mobile version