आज चेन्नई आणि बंगळुरूमध्ये चुरशीची लढत

आज चेन्नई आणि बंगळुरूमध्ये चुरशीची लढत

आयपीएल

आज बहूचर्चित, जल्लोषपुर्ण वातावरणात पार पडणारा आयपीएलचा बारावा सिझन आज म्हणजे शनिवारपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी खेळणार आहे. विराट आणि धोनी हे आमनेसामने असल्यामुळे या पहिल्याच सामन्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

चेन्नईच्या मैदानावर हा पहिला सामना रंगणार आहे. आता आपल्या घरच्या मैदानावर कोहली अण्ड टीमने धोनी अण्ड टीमला हरवला तर पहिला सामन्याची बंगळूरसाठी मस्त सुरूवात असणार आहे. या वेळीही धोनीच्या संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्यासाठी विजयी सुरुवात करण्यास हा संघ उत्सुक आहे. तुलनेत बेंगळुरूच्या संघ तरुण आहे. आयपीएलमधील सातत्यपूर्ण संघ अशी चेन्नई ओळख आहे. तर दुसरीकडे बेंगळुरू संघ ताकदीचा असला तरी महत्त्वाच्या लढतींमध्ये कच खातो. हे चित्र बऱ्याचदा दिसले आहे. शनिवारच्या या लढतीचे भवितव्य बऱ्याच अंशी गोलंदाजांवर अवलंबून असेल. उभय संघांतील गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांवर किती वचक ठेवतात ते महत्त्वाचे ठरेल.

चेन्नई संघात सर्वाधीक खेळाडू हे ३० वर्षांवरील आहेत. धोनी आणि शेन वॉटसन हे दोघेही ३७, तर ड्वेन ब्राव्हो ३५, फाफ डुप्लेसिस ३४ तसेच अंबाती रायुडू आणि केदार जाधव ३३, सुरेश रैना ३२, फिरकीपटू इम्रान ताहिर ३९ आणि हरभजनसिंग ३८ वर्षांचा आहे. पण या संघाने वयावर नेहमीच मात करत आयपीएलचे सामने गाजविले आहेत.

चेन्नई विरुद्ध बेंगळुरू

एकूण लढती : २३

चेन्नईचे विजय : १५

बेंगळुरूचे विजय : ७

अनिर्णित : १

First Published on: March 23, 2019 12:37 PM
Exit mobile version