टेबल टेनिसपटू मनिकाने ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

टेबल टेनिसपटू मनिकाने ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने शनिवारी ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. मनिका बत्रा जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या आणि तीन वेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या हिना हयाता विरुद्धचा कांस्यपदक सामना ४-२ ने जिंकला. (ITTF-ATTU Asian Cup table tennis tournament Manika Batra becomes first female Indian paddler to clinch bronze)

या सामन्यात मनिका बात्राने प्रतिस्पर्ध्याला ११-६, ६-११, ११-७, १२-१०, ४-११, ११-२ असे पराभूत केले. उपांत्य फेरीच्या लढतीत तिला मीमा इटोकडून २-४ (८-११, ११-७, ७-११, ६-११, ११-८, ७-११) असा पराभव पत्करावा लागला होता. तिला हरवल्यानंतरही तिने कांस्यपदकाच्या सामन्यात खेळून बक्षीस पटकावले.

यानंतर ती उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली. क्यूएफमध्ये तिने तैवानच्या चेन स्झु-यूचा ४-३ (६-११, ११-६, ११-५, ११-७, ८-११, ९-११, ११-९) असा पराभव करून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली.


हेही वाचा – BCCIच्या निवड समितीच्या प्रमुख पदासाठी अजित आगरकरचे नाव आघाडीवर

First Published on: November 19, 2022 7:07 PM
Exit mobile version