पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जयदीप परदेशीची षटकारांची आतषबाजी

पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जयदीप परदेशीची षटकारांची आतषबाजी

पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने विजय शिर्के क्रिकेट अकॅडमीचा ५० धावांनी पराभव केला आहे. तसंच, या विजयासह एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. षटकारांची आतषबाजी करणाऱ्या जयदीप परदेशीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने विजय मिळवला आहे.

दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहात झालेल्या सामन्यात जयदीपच्या तुफानी फलंदाजीमुळे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने २० षटकात ८ बाद २३८ धावांचा डोंगर उभारला. जयदीपने प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी फोडुन काढताना ७४ चेंडूत १०३ धावा करताना सात चौकार आणि दहा षटकार ठोकले. शम्स मुलानीने ४२ आणि शशिकांत कदमने ३० धावा केल्या. विजय शिर्के क्रिकेट अकॅडमीकडून आशुतोष उपाध्ययने सर्वाधिक ४९ धावांत ३ विकेट्स मिळवल्या.

वैभव बनेने दोन, अथर्व अंकोलेकर आणि हार्दिक कुरंगळेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्तरादाखल ओम केशकामतने नाबाद ९७ धावा करत संघाला विजयाची आस दाखवली. शतकाचा उंबरठा ओलांडू न शकलेल्या आपल्या खेळीत बारा चौकार आणि चार षटकार मारले. ओमच्या प्रयत्नांना साथ देताना हार्दिक कुरंगळेने २७ आणि शेखर दलालने १५ धावा केल्या. गोलंदाजीतही ठसा उमटवताना जयदीपने १ षटकात ५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स मिळवल्या. निपुण पांचाळ आणि शशिकांत कदमने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

अन्य लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करताना गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी संघावर सात विकेट्सनी विजय मिळवला. ओंकार जाधवने ५० आणि विकी पाटीलने ३० धावा करत पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करुन दिली. अर्जुन शेट्टीने ५४ आणि चिन्मय सुतारच्या नाबाद ३१ धावांमुळे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने ३ बाद १६८ धावा केल्या.

या आव्हानाला सामोरे जाताना गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी संघाला १६४ धावापर्यंत मजल मारता आली. त्यांच्या प्रणव यादवने अर्धशतकी खेळी करताना ५९ धावा केल्या. अंजदीप लाड आणि हेमंत बुचडेने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.


हेही वाचा – Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा पुढील सामन्यात समावेश होण्याची शक्यता, मुंबईच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

First Published on: May 6, 2022 7:25 PM
Exit mobile version