जय शाह यांचा पाकिस्तानला जोर का झटका, आशिया चषकवर केलं मोठं विधान

जय शाह यांचा पाकिस्तानला जोर का झटका, आशिया चषकवर केलं मोठं विधान

आयपीएल २०२३च्या १६ व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. परंतु भारतीय संघ हा पाकिस्तानात आशिया चषक खेळायला जाणार की नाही?, यावर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र, भारतीय नियामक क्रिकेट मंडळाचे सचिव जय शाह यांनी आशिया चषकवर मोठं विधान करत पाकिस्तानला जोर का झटका दिला आहे.

विमेन्स प्रीमियर लीग (WPL) पुढील हंगामापासून होम-अवे या फॉरमॅटमध्ये मोठ्या विंडोसह खेळणार आहे. या स्पर्धेला दिवाळीच्या दरम्यान सुरूवात होण्याची शक्यता आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा ४ ते २६ मार्चपर्यंत मुंबईतील दोन ठिकाणी खेळवण्यात आला होता. त्यामुळे आता आम्ही दिवाळीत विंडोमध्ये होम-अवे फॉरमॅटमध्ये डब्लूपीएल शेड्यूल करण्याच्या प्रयत्नात आहोत. महिला क्रिकेटला आता प्रेक्षकांचा बेस आहे आणि पुढील WPLसाठी अधिकाधिक लोक येण्याची आम्हाला अपेक्षा असल्याने ही संख्या वाढतच जाईल, असं जय शाह म्हणाले.

आशिया चषक खेळण्यासाठी भारत पाकिस्तानला जाणार नसल्याचे शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. ते म्हणाले की, याबाबत इतर देशांकडून प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत. त्यामुळे आम्ही त्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. आम्ही 2023 आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण निश्चित करण्यासाठी आणि भारत-पाकिस्तान सामन्याबाबत स्पष्टता मिळविण्यासाठी इतर देशांच्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत, असंही शाह म्हणाले.

जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) US$ 26.2 दशलक्ष कमावले आहेत. आम्ही ACCसाठी अतिरिक्त महसूल आणि नवीन महसूल निर्माण करण्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, असं शाह म्हणाले.


हेही वाचा : हैदराबादच्या ‘या’ खेळाडूने IPL 2023मध्ये ठोकले पहिले


 

First Published on: April 15, 2023 1:35 PM
Exit mobile version