IPL 2023 : हा निव्वळ वेडेपणा… चुकीच्या बातमीमुळे MIचा खेळाडू पत्रकारावर भडकला

IPL 2023 : हा निव्वळ वेडेपणा… चुकीच्या बातमीमुळे MIचा खेळाडू पत्रकारावर भडकला

आयपीएल २०२३ च्या सोळाव्या हंगामाचा थरार सुरू असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. मुंबई इंड़ियन्सला सात सामन्यांपैकी फक्त तीनच सामने जिंकता आले आहेत. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी होती. परंतु सलामीचा सामना खेळल्यानतंर पंजाबविरुद्धच्या सामना वगळता जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे इतर सामन्यांना मुकला आहे. शस्त्रक्रियेसाठी तो बेल्जियमला गेल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आर्चर एका पत्रकारावर चांगलाच भडकला.

टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, आर्चर एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी बेल्जियमला गेला होता. मागील २५ महिन्यांतील त्याची ही पाचवी शस्त्रक्रिया आहे. त्याच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. अशी माहिती समोर आल्यानंतर आर्चरने ट्वीट करत पत्रकाराचा समाचार घेतला आहे.

खरी परिस्थिती जाणून न घेता आणि माझ्या संमतीशिवाय एखादी बातमी टाकणे म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. रिपोर्टर, तुला लाज वाटली पाहिजे. एखाद्या खेळाडूसाठी त्रासदायक वेळ असताना तुम्ही तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्याचा फायदा घेत आहात, असं ट्वीट जोफ्रा आर्चरने करत पत्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

जोफ्रा आर्चर पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात खेळला होता. तेव्हा तो पूर्णपणे फीट दिसत होता. त्याने या सामन्यात ४ षटकं लगावली, ज्यामध्ये आर्चरने १४५ प्रति तास वेगानं गोलंदाजी केली होती.


हेही वाचा : IPL 2023: गुजरातच्या गोलंदाजांची कमाल; मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव


 

First Published on: April 26, 2023 4:49 PM
Exit mobile version