अंडर-16 महिला हॉकी लीगला आजपासून सुरुवात; 16 संघ भिडणार

अंडर-16 महिला हॉकी लीगला आजपासून सुरुवात; 16 संघ भिडणार

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता खेलो इंडिया मोहिमेतंर्गत अंडर-16 महिला हॉकी लीग 2022 ला सुरूवात होणार आहे. 16 ऑगस्टपासून (मंगळवार) सुरू होणार असून 16 संघ आमने-सामने येणार आहेत. हे सामने भारताच्या प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये सामन्यांची सुरुवात होणार आहे. खेलो इंडिया अंडर-16 महिला हॉकी लीग 2022 चा पहिला टप्पा 23 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या लीगच्या लीग सामन्यांसाठी संघांची विभागणी दोन पूलमध्ये करण्यात आली आहे. ‘पूल अ’ आणि ‘पूल ब’ असे 2 पूल करण्यात आले आहेत. या लीगमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला 2 गुण तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाणार आहे. तर पराभूत संघांना शून्य गुण मिळतील. या लीगमध्ये यावेळी एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. तर दोन्ही संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

हॉकी लीगमध्ये ‘या’ संघांचा सहभाग

भारतीय क्रीडा प्राधिकरण ‘अ’

भारतीय क्रीडा प्राधिकरण ‘बी’


हेही वाचा – सचिन तेंडुलकरचं स्टेट्स मला माहिती नव्हतं, शोएब अख्तरने सांगितला किस्सा

First Published on: August 16, 2022 8:26 AM
Exit mobile version