KKR vs RR Live Update : स्मिथ, सॅमसन झटपट माघारी 

KKR vs RR Live Update : स्मिथ, सॅमसन झटपट माघारी 

संजू सॅमसन

राजस्थानची ६ षटकांत २ बाद ३९ अशी धावसंख्या होती.
कर्णधार स्टिव्ह स्मिथ (२) आणि संजू सॅमसन (८) झटपट माघारी परतले. त्यांना अनुक्रमे पॅट कमिन्स आणि शिवम मावी यांनी बाद केले.
१७५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने दोन विकेट लवकर गमावल्या.
इयॉन मॉर्गनने (२३ चेंडूत नाबाद ३४) अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाताने २० षटकांत ६ बाद १७४ अशी धावसंख्या उभारली.
आंद्रे रसेल काही चांगले फटके मारल्यावर अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १४ चेंडूत २४ धावांची खेळी केली.
दिनेश कार्तिक अवघ्या एका धावेवर बाद
शुभमन गिल ४७ धावांवर बाद झाला. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले.
सुनील नरीनला (१५) जयदेव उनाडकटने, तर नितीश राणाला (२२) राहुल तेवातियाने बाद केले.
कोलकाता संघाची चांगली सुरुवात. १० षटकांत २ बाद ८२.
राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांचा हा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना आहे. राजस्थान दोन्ही सामने जिंकले आहेत, तर कोलकाताने एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला आहे.
आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होत आहे.
First Published on: September 30, 2020 10:08 PM
Exit mobile version