IPLनंतर WTC Finalमधून केएल राहुलची माघार, पोस्ट लिहित म्हणाला, ब्लू जर्सीत…

IPLनंतर WTC Finalमधून केएल राहुलची माघार, पोस्ट लिहित म्हणाला, ब्लू जर्सीत…

रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि लखनऊ यांच्यात सामना सुरू असताना कर्णधार के.एल.राहुलला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे चेन्नईविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला. परंतु दुखापत मोठी असल्याने के.एल. राहुल पुढील महिन्यात ७ जूनपासून इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. परंतु WTCच्या अंतिम सामन्याला मुकणार असून राहुलने एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि वैद्यकीय टीमशी सल्लामसलत केल्यानंतर असे समोर आले की, माझ्या मांडीवर लवकरच शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे आगामी काही दिवस मला विश्रांतीची गरज आहे. हा निर्णय घेणे खरोखरच कठीण आहे. परंतु मला माहिती आहे की, ठीक होण्यासाठी हा निर्णय योग्य आहे, असं पोस्टमध्ये के.एल. राहुलने लिहिलं आहे.

पण मला खात्री आहे की, माझ्या संघातील शिलेदार या प्रसंगाला समोरे जातील आणि नेहमीप्रमाणे त्यांची सर्वोत्तम कामगिरी करतील. मी पुढच्या महिन्यात भारतीय संघासोबत ओव्हलवर नसणार हे पूर्णपणे निराशाजनक आहे. ब्लू जर्सीत पुनरागमन करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असंही राहुलने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मला सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ज्यांनी मला परत येण्याचे बळ दिले. लखनौच्या संघाचे व्यवस्थापन आणि बीसीसीआय यांच्या तत्परतेबाबत तसेच पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी लवकरच मैदानात परत येण्याची आशा करतो, असेही राहुलने म्हटले आहे.

असा आहे भारतीय संघ –

रोहित शर्मा(कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस.भरत(यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव, जयदेव उनाडकट.


हेही वाचा : आधी IPL, आता के.एल. राहुल WTCच्या भारतीय संघातूनही बाहेर होण्याची शक्यता


 

First Published on: May 5, 2023 5:06 PM
Exit mobile version