कोहली तर क्रिकेटचा रोनाल्डो!

कोहली तर क्रिकेटचा रोनाल्डो!

ब्रायन लारा

क्रिस्तिआनो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे मागील दहा-बारा वर्षांपासून जगातील दोन सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये सतत तुलना होत असते. मेस्सीकडे रोनाल्डोपेक्षा जास्त प्रतिभा आहे असे म्हटले जाते, पण रोनाल्डोने अधिक मेहनत घेत मेस्सीइतकेच यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे भारताचे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे विराट कोहलीपेक्षा जास्त प्रतिभावान आहेत, पण कोहलीने खूप घेत त्यांच्याहूनही जास्त यश प्राप्त केले आहे. त्यामुळे कोहली हा क्रिकेटचा रोनाल्डो आहे, असे मत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने व्यक्त केले.

कोहली प्रचंड मेहनत घेत असून तो खूप सरावही करतो. त्याच्यात लोकेश राहुल किंवा रोहित शर्मापेक्षा जास्त प्रतिभा आहे असे नाही. मात्र, त्याच्यातील महान खेळाडू बनण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हीच गोष्ट त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळा बनवते. माझ्या मते, तो क्रिकेटचा क्रिस्तिआनो रोनाल्डो आहे. तो फारच फिट असून मानसिकदृष्ट्याही खूप सक्षम आहे, असे लाराने सांगितले.

First Published on: December 17, 2019 3:07 AM
Exit mobile version