IPL 2021 : धोनीच्या संघातून खेळायला मिळणार असल्याने स्वप्न झाले पूर्ण!

IPL 2021 : धोनीच्या संघातून खेळायला मिळणार असल्याने स्वप्न झाले पूर्ण!

कृष्णप्पा गौतम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा खेळाडू लिलाव नुकताच पार पडला. या लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसन या परदेशी खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागली. तसेच भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात मोठी बोली लागली ती कर्नाटकाचा फिरकीपटू कृष्णप्पा गौतमवर. गौतमला तब्बल ९.२५ कोटी रुपयांत चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले. तो आयपीएल लिलावातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. आता गौतमला भारताचा माजी कर्णधार आणि महान यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळणार आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळण्यास तो उत्सुक असून त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

माझ्यावर दडपण नाही

मला लिलावात मोठी रक्कम मिळाली, पण या गोष्टीचे माझ्यावर दडपण नाही. मला चांगली कामगिरी करून माझ्या संघाला सामने जिंकवायचे आहेत. मला स्थानिक क्रिकेटचा खूप अनुभव आहे. याचा मला फायदा होऊ शकेल. मला माझ्यावर लागलेल्या बोलीचा विचार करायचा नाही. अन्यथा मला चांगली कामगिरी अवघड होईल. मी आता माही भाईच्या (धोनी) नेतृत्वात खेळण्यास खूप उत्सुक आहे. त्याने भारताला वर्ल्डकप जिंकवून दिला असून तीन वेळा आयपीएल स्पर्धाही जिंकली आहे. त्याच्या संघातून खेळायला मिळणार असल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे गौतम म्हणाला.

 

First Published on: February 22, 2021 10:46 PM
Exit mobile version