L&T Mumbai Open : अंकिता रैना पराभूत

L&T Mumbai Open : अंकिता रैना पराभूत

अंकिता रैना

भारताची टेनिसपटू अंकिता रैना एल अँड टी मुंबई ओपनमध्ये पराभूत झाली आहे. तिच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या अंकिताचा दुसऱ्या फेरीत मोंटेनेग्रोच्या डांका कोविनीच हिने ६-२, ७-५ असा पराभव केला.

दुसऱ्या सेटमध्ये चांगला लढा

एल अँड टी मुंबई ओपनमधील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अंकिताची सुरुवात चांगली झाली नाही. तिने हा सेट ६-२ अशा मोठ्या फरकाने जिंकला. पण दुसऱ्या फेरीत अंकिताने कोविनीचला चांगला लढा दिला. तिला या सेटच्या सुरुवातीला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे ती १-४ अशा मोठ्या फरकाने मागे होती. पण यानंतर तिने चांगला खेळ केला. तिने सलग ३ पॉईंट मिळवत सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी केली. तर अंकिताने पुढचाही पॉईंट मिळवत या सेटमध्ये ५-४ अशी आघाडी मिळवली. पण नंतर कोविनीचने आपला खेळ उंचावला. तिने अंकिताला पॉईंट मिळवायची संधी दिली नाही. त्यामुळे तिने हा सेट ७-५ असा जिंकत हा सामनाही जिंकला.
First Published on: November 2, 2018 5:53 PM
Exit mobile version