Indian Premier League 2022: लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून नव्या लोगोचं अनावरण

Indian Premier League 2022: लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून नव्या लोगोचं अनावरण

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच सहभाग घेणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स या संघाकडून नव्या लोगोचं अनावरण करण्यात आलंय. संध्याकाळी पाच वाजता ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात घोषणा करण्यात आली. तसेच लखनऊच्या नवीन आयपीएल फ्रॅचायझीसाठी केएल राहुलचे नाव समोर आले आहे. त्याचप्रमाणे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली हा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

लोगोमध्ये बॅटसोबत पंख लावण्यात आले आहेत. तसेच त्या पंखांचा रंग तिरंगी झेंड्याप्रमाणे आहे. तसेच यामध्ये टीमचं नावदेखील देण्यात आलंय. ट्विटरवर एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये महानतेची दिशेने वाटचाल असं कॅप्शन देण्यात आलंय. लखनऊ सुपर जायंट्स आपले पंख पसरवण्यासाठी पुर्णपणे तयार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा संघा आहे. आरपी संजीव गोयन्का ग्रूपने ७ हजार ९० कोटी रूपयांना विक्री केली आहे. मेगा ऑक्शनच्या आधी केएल राहुलला १७ कोटी रूपये खर्च करून संघामध्ये सहभागी करून घेण्यात आलंय. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या खेळाडूला संयुक्तपणे दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोइनिस(९.५ कोटी), पंजाबमधून रवी बिश्नोई (४ कोटी) रूपयांना सहभागी करण्यात आलंय. लखनऊ संघाने टिम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरला मेंटर म्हणून नियुक्त केलंय. तसेच झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर यांना लखनऊ फ्रेंचाइजी टीमचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीझनमध्ये लखनऊ फ्रेंचाइजीमध्ये आता ते पदार्पण करत आहेत.

दरम्यान, यंदाच्या आयपीलमध्ये एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये १२-१३ तारखेला बंगळुरू मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे.


हेही वाचा : महावितरणच्या सौर कृषी ऊर्जा प्रकल्पांची वाटचाल जोमात, ४५ हजार ६६४ शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा


 

First Published on: January 31, 2022 7:12 PM
Exit mobile version