भिवंडीच्या नेहा फुफाणेची रौप्य कमाई

भिवंडीच्या नेहा फुफाणेची रौप्य कमाई

नेहा फुफाणे

भिवंडीची रहिवासी असणार्‍या नेहा फुफाणेने महाराष्ट्र राज्य संघटनेने आयोजित रत्नागिरी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने १० मिनिटे आणि ५५ सेकंड अशी विक्रमी वेळ नोंदवत हे पदक मिळवले. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यामुळे नेहाला शिवसेना प्रणित अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील बालेवाडीत प्रवेश मिळाला. त्यानंतर औरंगाबादच्या क्रीडा प्रबोधिनीत जागतिक दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने वर्षभर सराव केला. औरंगाबाद जिल्ह्यातही नेहाने विविध स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केले.

रत्नागिरी येथे झालेल्या अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १६-१८ वयोगटातील मुलींमध्ये तिने दुसरा क्रमांक मिळवला. तिचे सुवर्णपदक अवघ्या काही सेकंदासाठी हुकले. तिला सुवर्णपदक मिळाले नसले तरी, तिची भारतातील इतर स्पर्धांसाठी निवड झाली. तसेच तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचीही संधी मिळणार आहे.

First Published on: August 21, 2019 5:09 AM
Exit mobile version