एमसीएच्या निवड समित्यांना हटविण्यासाठी विशेष सर्वासाधारण सभा

एमसीएच्या निवड समित्यांना हटविण्यासाठी विशेष सर्वासाधारण सभा

मुंबई क्रिकेट असोसिएशन

मुंबई क्रिकेटचा दिवसेंदिवस उतरणारा आलेख, त्यातच संघनिवडीतील अनियमितता यामुळे रणजी तसेच २३ वर्षांखालील मुलांच्या निवड समित्यांना हटविण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सदस्य क्लब पारशी जिमखानाचे उपाध्यक्ष खोदादाद याझदेगार्दी यांनी विशेष सर्वासाधारण सभा २१ फेब्रुवारीला बोलावली आहे. मुंबई क्रिकेटच्या वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर आहे.

निवड समित्यांना हटविण्याची अशाप्रकारची मागणी होण्याची मुंबई क्रिकेटमधील ही पहिलीच वेळ आहे. ४१ वेळा विजेत्या मुंबईला यंदाच्या रणजी चषकाची बाद फेरीही गाठता आली नाही. संघाच्या या खराब प्रदर्शनामुळे आता निवड समित्यांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. २१ फेब्रुवारीला ही विशेष सर्वासाधारण सभा वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

सध्या एमसीएच्या हंगामी समितीला अशी सभा बोलावण्याचा अधिकार नाही, पण नियम क्रमांक ३७ नुसार सदस्य क्लबचे प्रतिनिधी अशी सभा बोलवू शकतात. या समितीने याझदेगार्दी यांना पत्र पाठवून तुम्ही अशी सभा बोलावू शकता आणि सदस्यांनाही तसे कळवू शकता असे म्हटले होते. याझदेगार्दी यांनी मागील जुलैमध्येही क्रिकेट मोसम सुरू होण्याआधी निवड समितीचे चारही सदस्य मुंबईमधील स्थानिक सामने पाहत नाहीत, त्यामुळे या स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करणार्‍या खेळाडूंचा मुंबईच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश होत नाही, असा आरोप केला होता.

First Published on: February 13, 2019 4:58 AM
Exit mobile version