IPL 2020 : म्हणून रोहित शर्मा CSKविरुद्धच्या सामन्याला मुकला 

IPL 2020 : म्हणून रोहित शर्मा CSKविरुद्धच्या सामन्याला मुकला 

रोहित शर्मा

आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना होत आहे. मात्र, सामना सुरु होण्यापूर्वीच गतविजेत्या मुंबईला मोठा धक्का बसला. त्यांचा कर्णधार रोहित शर्माला पायाच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागले आहे. रोहितला ही दुखापत मागील रविवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात झाली होती. चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितच्या दुखापतीविषयी मुंबई इंडियन्स संघाने सांगितले, ‘मुंबईच्या मागील सामन्यात रोहित शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली. मागील चार दिवसांमध्ये रोहितची दुखापत बरी होत आहे. मात्र, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रोहितला विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याच्या अनुपस्थितीत किरॉन पोलार्ड मुंबईचे नेतृत्व करेल.’

मागील रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना झाला. या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांनी ५-५ धावा केल्या. यावेळी मुंबईकडून रोहित शर्मा फलंदाजीला आला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत पोलार्डने मुंबईचे नेतृत्व केले होते. ‘रोहितला थोडे बरे वाटत नसल्याने तो मैदानाबाहेर होता,’ असे सामन्यानंतर पोलार्ड म्हणाला होता. मात्र, त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई संघाने सांगितले.

First Published on: October 23, 2020 8:41 PM
Exit mobile version