हसीन जहाँने बीसीसीआयला पाठवले पत्र; शमीच्या अडचणी वाढल्या

हसीन जहाँने बीसीसीआयला पाठवले पत्र; शमीच्या अडचणी वाढल्या

हसीन जहाँने बीसीसीआयला पाठवले पत्र; शमीच्या अडचणी वाढल्या

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने आता भारतीय नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा फार मोठा फटका शमीला बसू शकतो. आगामी वर्ल्ड कपमध्ये शमी स्थान मिळाले असले तरी पत्नीच्या आरोपांमुळे त्याला कदाचित खेळता येऊ शकणार नाही. गुरुवारी कोलकाता पोलिसांनी शमीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. यानंतर शमीच्या पत्नीने म्हणजे हसीन जहाँने बीसीसीआयला पत्र पाठवून शमीवर कारवाई कधी कराल? असा प्रश्न विचारला आहे.

मी योग्य असल्याचे सिद्ध झाले – हसीन

कोलकाता पोलिसांनी शमीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यामुळे हसीनने पोलिसांचे आभार मानले आहे. हसीन म्हणाली की, ‘शमीवर आरोपपत्र दाखल झाल्याचा आनंद आहे. पोलिसांचे मी आभार मानते. आता या प्रकरणात बीसीसीआय शमीवर कधी कारवाई करणार, याची प्रतिक्षा आहे. मी बीसीसीआयला तसे पत्र पाठवले आहे. ते शमीवर का कारावाई करत नाही, हे कळेनासे झाले आहे.’ यापुढे हसीन जहाँ म्हणते की, पोलिसांच्या या कारवाईमुळे मला दिलासा मिळाला. मी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये असताना, संपूर्ण देश त्याच्या पाठिशी असतानाही कोलकाता पोलीस आणि बंगालच्या प्रशासनानं मला सहकार्य केलं. त्यांची मी ऋणी आहे. आरोपांचे सर्व पुरावे मी दिले आहेत. पोलिसांच्या पुढील तपासणीत सर्व उघडकीस येईलच. माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.


हेही वाचा – मोहम्मद शमीच्या अडचणी वाढल्या; वर्ल्ड कप खेळणं धोक्यात

First Published on: March 15, 2019 6:11 PM
Exit mobile version