IPL लिलावातील जायंट किलर ठरला इशान किशन ! मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार

IPL लिलावातील जायंट किलर ठरला इशान किशन ! मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार

आयपीएल २०२२ च्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आलेली आहे. तर काही खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. श्रेयस अय्यरनंतर आयपीएलच्या लिलावातील सुपर जायंट किलर इशान किशन ठरला आहे. तसेच त्याला मुंबई इंडियन्स या संघाने १५.२५ कोटींनी खरेदी केलं आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलाव प्रक्रियेत इशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

MI Vs SRH मध्ये लागली चुरस

मुंबईकर श्रेयस अय्यरची अपक्षेप्रमाणे २ कोटी मूळ किंमत होती. मात्र अय्यरला १० कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला १२.२५ कोटींना खरेदी केलं आहे. मुंबई इंडियन्सने इशान किशनला पु्न्हा एकदा रिटेन केलंय. पंजाब किंग्सने त्याच्यावर सह कोटींसाठी बोली लावली होती. मात्र, गुजरात टायटन्सने त्याला १० कोटींमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरस लागल्यानंतर शेवटी मुंबई इंडियन्सने बाजी मारत १५.२५ कोटींनी त्याला खरेदी केलं आहे.

२०२० च्या हंगामात इशांत किशनची उत्कृष्ट खेळी

कोरोना महामारीत २०२० हे वर्ष इशान किशनसाठी करियर बदलणारे ठरले आहे. दुबईमध्ये झालेल्या हंगामात सर्वात यशस्वी खेळाडू इशांत ठरलाय. त्याने ५७.३३ च्या सरासरीत ५१६ धावा केल्या आहेत आणि संघात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. २०१८ मध्ये मुंबईसाठी खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये २७.७ च्या सरासरीने २७७ धावा काढल्या होत्या. तसेच २०१९ मध्ये त्याला फक्त सात सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये १६.८३ च्या सरासरीने १०१ धावा काढल्या होत्या.

दरम्यान, टीम इंडियासाठी ३ वनडे आणि ५ टी-२० सामने इशान किशनने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण २०१ धावा काढल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये किशानचा चांगला रेकॉर्ड आहे.


हेही वाचा :IPL 2022 Mega Auction: Unsold ! सुरेश रैनासह ‘या’ दिग्गज खेळाडूंसाठी बोलीच लागली नाही


 

First Published on: February 12, 2022 5:23 PM
Exit mobile version