IPL, Rohit Sharma: मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव, रोहित शर्मा झाला भावूक

IPL, Rohit Sharma: मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव, रोहित शर्मा झाला भावूक

आयपीएल २०२२ चे १५ वे हंगाम आतापर्यंत कोणत्या संघासाठी वाईट ठरले असेल ते म्हणजे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आहे. काल बुधवारी पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सला सलग पाचव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला झालंय तरी काय, असा प्रश्न आता चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा देखील भावूक झाला आहे. शर्मा स्वतः नाराज असून त्यालाही संघामध्ये काय सुरू आहे, हे अद्यापही समजत नाहीये. परंतु त्याने पराभवानंतर मोठं वक्तव्य केलंय.

संघातील कोणत्याही प्रकारचा दोष शोधणे कठीण

आपल्या संघातील कोणत्याही प्रकारचा दोष शोधणे कठीण आहे. आम्ही चांगली खेळी केली आणि विजयाच्या अगदी जवळ आलो. पण दोन फलंदाजांच्या धावबादमुळे आमचे मोठे नुकसान झाले. एकेकाळी आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर होतो पण गती राखू शकलो नाही, पंजाबच्या गोलंदाजांचे आभार. १९९ चे लक्ष्य गाठता आले असते. परंतु आम्ही आमच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करू, असं रोहित शर्मा म्हणाला.

मुंबईचा सलग पाचवा पराभव

मुंबईच्या संघाला सलग पाच वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्जने मुंबईवर १२ धावांनी मात केली. या पराभवानंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. आता या संघाला लीगमध्ये टिकण्यासाठी ९ पैकी ८ सामने जिंकावे लागणार आहेत. या स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ आता आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ असू शकतो.

दरम्यान, पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. पुण्याच्या मैदानात आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये मुंबईने या हंगामात सर्वात जास्त धावा दिल्या आहेत. पंजाबने यावेळी पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६५ अशी मजल मारली. तर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची पंजाबच्या सलामीवीरांनी चांगलीच धुलाई केली आणि त्यांचा पराभव केला.


हेही वाचा : Gang Rape On Lizard : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घोरपडीवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक


 

First Published on: April 14, 2022 9:40 AM
Exit mobile version