घरताज्या घडामोडीGang Rape On Lizard : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घोरपडीवर सामूहिक बलात्कार; चार...

Gang Rape On Lizard : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घोरपडीवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

Subscribe

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घोरपडीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे गाव येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या चार आरोपींपैकी एकाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीतील आरोपींपैकी एका आरोपीकडून या प्रकरणाची माहिती मोबाईल वरील रेकॉर्डवरून वनाधिकाऱ्यांना मिळाली.

घोरपडीसारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत असे कृत्य करणाऱ्याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात ३१ मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. या चौकशीत शिकऱ्यांकडून दोन बंदुका तसेच दोन दुचाकीही वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत.

- Advertisement -

काही तरूणांनी शिकारीसाठी आल्यानंतर एक घोरपड त्यांच्या हाती लागली. त्यानंतर यातील एकाने या मुक्या प्राण्यासोबत हे धक्कादायक कृत्य केलं आहे. एका वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. दरम्यान, अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची यावर वनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातंय.

वन्य प्राण्यावर बलात्काराची पहिलीच घटना

घोरपडीसारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत संभोग करण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्याला वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. गुप्त माहितीच्या आधारे, एका आरोपीला हातिव गावातून तर दोन आरोपींना संगमेश्वर तालुका येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, राजस्थानमध्ये काही वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. आठ जणांनी एका पाळीव शेळीवर बलात्कार केला होता. त्यावर आरोपींना शिक्षा झाली होती. मात्र शेळी ही पाळीव प्राणी आहे, घोरपड ही वन्य प्राणी आहे. त्यामुळे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.


हेही वाचा : नागपूर, पिंपरी-चिंचवड पालिकांमधील भ्रष्टाचाराचे पैसे कोणाच्या तिजोरीत जात आहेत?, सामनातून सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -