आशियाई स्पर्धेत नाशिकच्या शरीरसौष्ठवपटूंची चमक

आशियाई स्पर्धेत नाशिकच्या शरीरसौष्ठवपटूंची चमक

वजय भोयार ठरला ‘मिस्टर आशिया’

नॅक इंटरनॅशनल जर्मनी आणि इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे झालेल्या मिस आशिया आणि मिस्टर आशिया अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताच्या विजय भोयारने मिस्टर आशिया, तर भारताच्याच मंगला सेनने मिस आशिया हा किताब पटकावला. त्यांना एक लाख रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेत भारतासह नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या एकूण १५० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला होता. यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या नाशिकच्या तीन शरीरसौष्ठवपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत लक्ष वेधले.

मिस्टर आशिया स्पर्धेत नाशिकच्या मनोज कांबळे यांनी ४० वर्षांवरील आणि मुश्ताक शेख यांनी ५० वर्षांवरील गटात कास्यपदक पटकावले, तर विकास देवरे याने पाचवा क्रमांक पटकावला. कांबळे हे मनमाड येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) येथे कार्यरत असून, त्यांची मुलगीदेखील राष्ट्रीय वेटलिफ्टर आहे. मुश्ताक शेख हे नाशिक जिल्हा भूमिअभिलेखच्या नांदगाव विभागात कार्यरत आहेत.

First Published on: February 13, 2019 5:02 AM
Exit mobile version