पाकिस्तानच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चा शरद पवारांनाही आनंद; हात उंचावत केला जल्लोष

पाकिस्तानच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चा शरद पवारांनाही आनंद; हात उंचावत केला जल्लोष

आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. शेवट्याच्या लक्षात भारताने हा सामान जिंकला. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या तुफीने खेळीने शेवटच्या षटकात सिक्स मारत भारताला विजय मिळवून दिला. ज्यामुळे हार्दिक पंड्याच्या खेळीने पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला. भारताच्या विजयामुळे अनेक शहरांतील रस्त्या रस्त्यांवर जल्लोष करण्यात आला. दरम्यान सोशल मीडियावरही भारतीय विजयाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यातील एका व्हिडीओची सध्या महाराष्ट्रात तुफान चर्चा आहे. हा व्हिडीओ म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा. शरद पवार यांनीही भारताच्या विजयानंतर जल्लोष साजरा केला. पवार यांनी आपला हात उंचावत व्हिक्ट्रीची साईन दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची आता देशभर चर्चा सुरु आहे. 11 सेकंदाच्या या व्हिडीओतील पवारांचे क्रिकेटप्रेम पाहून अनेकांची मनं जिंकली आहे.

आशिया चषक : भारताची पाकिस्तानवर पाच गडी राखून मात, 10 महिन्यांत काढला वचपा

या व्हिडिओमध्ये शरद पवार आपल्या नातवांसोबत टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. यात त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे त्यांची मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे दिसत आहे. या व्हिडीओला आता क्रिकेट प्रेमींकडूनही भरघोस प्रतिक्रिया येत आहेच. जिंदादिल इन्सान…” म्हणत अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांच्या व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा स्टेट्सवर या व्हिडीओची हवा पाहायला मिळत आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ ट्विटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आजचा रविवारचा दिवस आनंदी बनवल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे आभार!”. दरम्यान हा व्हिडीओ आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिकांनी पाहिला आहे. तर 14 हजारांहून अधिकांनी लाईक्स केला आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला.भारताने आशिया चषक पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला. दरम्यान कालच्या सामन्यात हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. भारलाचा विजयासाठी चार चेंडूत 6 धावांची गरज होती. यावेळी अष्टपैलू खेळाडू हार्दिकने एक खेळीत पाकिस्तानचा गेम करत खेळ पलटवला. मोहम्मद नवाजच्या पुढच्याच चेंडूवर हार्दिकने थेट षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केला.

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत भारतीय क्रिकेट संघाचे विजयानंतर कौतुक केले आहे. मोदींनी ट्विट करत म्हटले की,“आजच्या आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय संघाने उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. भारतीय संघाने उत्तम कौशल्य आणि चिकाटी दाखवली. विजयाबद्दल त्याचं अभिनंदन.


भारताचा सूर्य तळपतोय, संधीचं सोनं करतोय!


First Published on: August 29, 2022 9:31 AM
Exit mobile version