शेतकऱ्याचा मुलगा, १९ व्या वयात आर्मी ऑफिसर…सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राची कहाणी!

शेतकऱ्याचा मुलगा, १९ व्या वयात आर्मी ऑफिसर…सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राची कहाणी!

Neeraj Chopra: सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रासाठी भारत सरकारने केला तब्बल सात कोटी रुपयांचा खर्च

भारतासाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. ज्या सुवर्णपदकाकडे भारतीय आशेने पाहत होते, ती आशा नीरज चोप्राने भालापेकमध्ये पूर्ण केली आहे. चमकदार कामगिरी करत नीरजने सुवर्णपदक पटकावले. नीरजने अंतिम फेरीत आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि पहिल्याच थ्रोमध्ये भाला ८७.०३ मीटर दूर फेकला. यानंतर, दुसऱ्या थ्रोमध्ये स्वत: ची कामगिरी सुधारत त्याने ८७.५८ मीटर दूर भाला फेकला.

शेतकऱ्याचा मुलगा ते सुवर्णकामगिरी

नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ रोजी हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंड्रा गावात एका छोट्या शेतकऱ्याच्या घरी झाला. नीरजने चंदीगडमधून शिक्षण घेतलं. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरी जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला.

जागतिक मेडल अन् सैन्यात अधिकारी

पोलंडमध्ये २०१६ च्या IAAF जागतिक २० वर्षांखालील चॅम्पियनशिपमध्ये नीरजने ८६.४८ मीटर भाला फेकून सुवर्ण जिंकलं. अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक स्तरावरच्या अॅथलेटिक स्पर्धेत पदक पटकवणारा नीरज दुसरा भारतीय ठरला होता. या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

लष्करातून नोकरी मिळाल्यानंतर नीरज एका मुलाखतीत म्हणाला होता, “माझे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. माझ्या कुटुंबात कोणालाही सरकारी नोकरी नाही. म्हणूनच प्रत्येकजण आनंदी आहे. आता मी माझे प्रशिक्षण चालू ठेवू शकतो तसेच माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतो.”

३ मे २०१९ ला कोपराची शस्त्रक्रिया

नीरज चोप्राच्या कोपऱ्या ३ मे २०१९ ला शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आज ७ ऑगस्ट २०२१ ला त्याने जिद्दीने सुवर्णपदक कमावलं आहे.

 

First Published on: August 7, 2021 7:39 PM
Exit mobile version