पहिल्या कसोटीत न्यूझीलंडची बाजी

पहिल्या कसोटीत न्यूझीलंडची बाजी

वेगवान गोलंदाज निल वॅग्नरने दुसर्‍या डावात केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि ६५ धावांनी पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडने २ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात २०५ धावांची विक्रमी खेळी करणार्‍या यष्टीरक्षक-फलंदाज बीजे वॉटलिंगला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३५३ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना न्यूझीलंडने आपला पहिला डाव ९ बाद ६१५ धावांवर घोषित केला. त्यामुळे त्यांना २६३ धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडची चौथ्या दिवसअखेर दुसर्‍या डावात ३ बाद ५५ अशी अवस्था होती. पाचव्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी झुंज देता आली नाही.

जो डेंली (३५) आणि तळाच्या जोफ्रा आर्चर (३०), सॅम करन (२९) यांनी चांगली फलंदाजी केली, पण त्यांना इतरांची साथ लाभली नाही. न्यूझीलंडकडून वॅग्नरने ४४ धावांत ५ विकेट्स मिळवल्या. त्याला डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने ३ बळी घेत उत्तम साथ दिली.

First Published on: November 26, 2019 5:22 AM
Exit mobile version