लघुशंकेसाठी फलंदाज मैदान सोडून पळाला; व्हिडिओ व्हायरल

लघुशंकेसाठी फलंदाज मैदान सोडून पळाला; व्हिडिओ व्हायरल

लघवीसाठी फलंदाज मैदान सोडून पळाला

ऑस्ट्रेलियामध्ये पुढच्या वर्षी टी-ट्वेंटी विश्चचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी अबुधाबी येथे सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत. मंगळवारी कॅनडा आणि नायजेरिया या दोन संघामध्ये सामना सुरू होता. या सामन्या दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्व खेळाडू आणि पंचांपासून प्रत्येक प्रेक्षकालाही हसू आवरलं नाही. या घटनेमुळे हा सामना अचानक मध्येच थांबवावा लागला.

हेही वाचा –प्रामाणिक प्रयत्नांमुळेचआम्ही यशस्वी होतोय!

नेमकं काय घडलं?

नायजेरियाचा फलंदाज सुलेमान रुन्सेवे अचानक मैदानातून बाहेर धावत गेला. पण, तो का धावला? याचं कारण कोणालाच कळत नव्हतं. काही वेळानंतर सुलेमान पुन्हा मैदानाच्या दिशेने धावला. ही सर्व दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर मैदानातील प्रत्येकाला नेमकं काय घडलं असावं? याचा अंदाज आला आणि प्रत्येक जण पोट धरुन हसायला लागला. खरंतर खूप वेळ खेळल्यामुळे सुलेमानला लघवीला आली होती. अजून नाही थांबवू शकत, असं म्हणत सुलेमान मैदानाबाहेर पडला. सामना पुढे न्यायला हवा या काळजीने नायजेरियाचा कर्णधार एडेमोला ओनिकोई हा फलंदाजीसाठी मैदानात आला. पण, तेवढ्यात पंचांना सुलेमान पुन्हा परतताना दिसला आणि त्यांनी कर्णधाराला परत पाठवले.

‘अधिक काळ रोखू शकत नव्हतो’

सुलेमान जेव्हा मैदानातून पळाला तेव्हा आठवे षटक सुरू होते. रुन्सेवे जेव्हा मैदानात आला तेव्हा पंचांनी त्याला अचानक मैदानातून का पळालास याचं कारण विचारलं असता तो म्हणाला की ‘मला जोराची शू ला लागली होती.’ अधिक काळ रोखून धरु शकत नसल्याने मैदानातून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असंही तो म्हणाला. मैदानात परत येण्यापूर्वी पँट खाली करुन थायपॅड नीट करत असतानाचा सुलेमानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नायजेरियाच्या समोर १५० धावांचं आव्हान होतं. पण, १०९ धावांमध्येच नायजेरिया संघ बाद झाला. म्हणजे सुलेमानने घेतलेली एवढी मेहनत फुकट गेली. कारण, त्याने २७ चेंडूत २७ धावा केल्या. सुलेमानने पोट रिकामी केलं तरी तो काही चांगली कामगिरी करु शकला नाही, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.


हेही वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मॉडेलच्या पायाखाली, टाईम्स स्क्वेअर चौकात पोस्टर!

First Published on: October 23, 2019 7:17 PM
Exit mobile version