नदालला पराभूत करून नोव्हाक विम्बल्डन फायनलमध्ये!

नदालला पराभूत करून नोव्हाक विम्बल्डन फायनलमध्ये!

नोव्हाक

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालचा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यामुळे त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. चुरशीच्या झालेल्या सामन्यात सर्बियाच्या नोव्हाकने नदालला मात देत विजय मिळवला आहे. नोव्हाकच्या या अप्रतिम विजयामुळे त्याने थेट फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. उपांत्यपूर्व फेरीत नोव्हाकने जपानच्या निशिकोरीला मात देत उपांत्य फेरीत जागा मिळवली होती. तर राफेलने अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोला मात देत उपांत्यफेरी गाठली होती.

हेही वाचा– विम्बल्डन Men’s Semi Final: जोकोविच की नदाल? चुरशीला सुरुवात

उपांत्यफेरीच्या सामन्यात नदाल आणि नोव्हाक दोघेही सुरूवातीपासूनच सामन्यात आक्रमक खेळी करताना दिसून येत होते. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात नोव्हाकने पहिला सेट ६-४ च्या फरकाने जिंकला. तर दुसरा सेट नदालने ६-३ च्या फरकाने जिंकत सामन्यात बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकने विजय मिळवत सामन्यातील तीन पैकी दोन सेट जिंकत अंतिम फेरीत झेप घेतली.

फायनलमध्ये नोव्हाक विरूद्ध केविन

अंतिम सामन्यात नोव्हाकला आता केविन अँडरसनशी लढावे लागणार आहे. केविनने उंपात्यफेरीत विश्वविजेता रॉजरला नमवत अंतिम सामना गाठला आहे. अंतिम सामन्यात झेप घेतलेल्या दोन्ही खेळाडूंनी उंपात्य फेरीत जगातील अप्रतिम खेळांडूंना नमवल्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होणार हे नक्की!

 

 

First Published on: July 15, 2018 2:30 PM
Exit mobile version