Nz vs AFG : अफगाणिस्तान जिंकणार ? अश्विनने दिली प्रतिक्रिया, अन् राशिदही व्यक्त झाला

Nz vs AFG : अफगाणिस्तान जिंकणार ? अश्विनने दिली प्रतिक्रिया, अन् राशिदही व्यक्त झाला

टी-२० विश्वचषकामध्ये भारत आणि अफगाणिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच सामना झाला त्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानच्या संघाचा दारूण पराभव केला होता. उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला अफगाणिस्तानविरूध्दचा सामना ‘करो या मरो’ असा होता. तर भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा अफगाणिस्तान विरूध्द न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्यावर टिकून राहिली आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तानने त्यांच्या पुढील सामन्यांत न्यूझीलंडचा पराभव करणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय संघाचे अफगाणिस्तानच्या खेळीकडे लक्ष लागले आहे. अशातच भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याला अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानने त्याच्या शैलीत उत्तर दिले आहे.

अश्विनने अफगाणिस्तानच्या विजयाचा भारतीय संघाला होणारा फायदा लक्षात घेऊन सांगितले की, “मला खरोखर वाटते की जर आपण मुजीबला शारिरीक बाबीत काही मदत करू शकलो तर. त्याला फिल्डिंगसाठी घेऊन आलो असतो. यावरून लक्षात येते की भारतीय संघाला मुजीब उर रहमानला तंदुरूस्त होण्यासाठी मदत करायची आहे. कारण तो न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात खेळू शकेल. अश्विन मस्करीत याबाबत बोलला होता. त्यावर आता अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने उत्तर दिले आहे.

राशिद खानने ट्विट करत म्हटले की, “काळजी करू नको भाई, अफगाणिस्तानचा संघ शारिरीकदृष्ट्या प्रशांत पंचदा सारख्या खेळाडूंची चांगली देखभाल करत आहेत. अशा शब्दांत राशिदने हटक्या शैलीत अश्विनला उत्तर दिले. भारतीय संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी अफगाणिस्तानने त्यांच्या पुढच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करणे गरजेचे आहे. कारण भारतीय संघ सध्या ग्रुप बी च्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ ६ अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे. जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तर न्यूझीलंडचे ६ गुण राहतील आणि भारतीय संघाने आपल्या पुढील सामन्यात नामिबियाचा पराभव केला तर भारतीय संघाचे ६ अंक होतील. जर असे झाल्यास नेट-रनरेट वरून उपांत्य फेरीचा संघ निवडला जाईल आणि त्याचा भारताला फायदा होऊ शकतो. सध्या भारताचा नेट-रनरेट न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानपेक्षा जास्त आहे.


हेही – T20 world cup 2021: “सोशल मीडियाला कोणीही रोखू शकत नाही; शोएब अख्तरचा न्यूझीलंडला इशारा

First Published on: November 6, 2021 4:00 PM
Exit mobile version