Omicron : Ind vs SA भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा टांगणीला

Omicron : Ind vs SA भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा टांगणीला

ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हेरीयंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अतिशय वेगाने पसरणाऱ्या व्हेरीयंटमुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही या व्हेरीयंटची गणना ही व्हेरीयंट ऑफ कन्सर्नमध्ये केली आहे. पण नव्या व्हेरीयंटचा परिणाम म्हणजे आगामी काळातील भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौरा नियोजित वेळापत्रकानुसार आहे. पण नव्या कोरोनाच्या व्हेरीयंटमुळे या दौऱ्यावर अनिश्चिततेचे वादळ निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ओमिक्रॉनच्या व्हेरीयंट ऑफ कन्सर्न म्हणून नमुद करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हायरस हा दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर भागात फैलावत आहे. याठिकाणी भारतीय संघाच्या दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. जोहान्सबर्ग आणि प्रेटोरिया (सेंच्युरियन) येथे आयोजित करण्यात आले आहेत. पण नव्या व्हेरीयंटमुळे हा दौरा आता वादाच्या भौऱ्यात अडकला आहे. आतापर्यंत या दौऱ्यात कोणताही बदल नव्हता, पण बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आता या दौऱ्याबाबत शंका उपस्थित केली आहे. बीसीसीआयकडून सरकारला विचारणा करूनच हा दौरा करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.

क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या वतीने या दौऱ्याबाबतची सविस्तर परिस्थिती माहिती करून घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल. सध्याच्या नियोजनानुसार दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ हा ८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला जाणे अपेक्षित आहे. कारण सध्याची न्यूझीलंडसोबतची सिरीज संपण्याची भारतीय संघ वाट पाहत आहे. या दौऱ्यासाठी शेवटचा सामना हा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

मुंबईतून सर्व खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी चार्टर्ड फ्लाईटने पाठवण्यात येईल. पण खेळाडूंना तीन ते चार दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन करण्यात येणार आहे. पण सद्यस्थितीला दक्षिण आफ्रिकेत तसेच युरोपियन युनियनच्या माध्यमातून फ्लाईट्स ज्या पद्धतीने रद्द करण्यात येत आहेत, त्यानुसार सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील, अशी माहिती एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.

भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

1st Test: December 17-21: Wanderers, Johannesburg

2nd Test: December 26-30: SuperSport Park, Centurion

3rd Test: January 3-7: Newlands, Cape Town

1st ODI: January 11: Boland Park, Paarl

2nd ODI: January 14: Newlands, Cape Town

3rd ODI: January 16: Newlands, Cape Town

1st T20I: January 19: Newlands, Cape Town

2nd T20I: January 21: Newlands, Cape Town

3rd T20I: January 23: Boland Park, Paarl

4th T20I: January 26: Boland Park, Paarl


 

First Published on: November 27, 2021 5:24 PM
Exit mobile version