IPL 2020 : KKRच्या फलंदाजांनी निराशा केली – कर्णधार मॉर्गन

IPL 2020 : KKRच्या फलंदाजांनी निराशा केली – कर्णधार मॉर्गन

इयॉन मॉर्गन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या (RCB) आयपीएल लढतीत कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय फलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. कोलकाताला २० षटकांत केवळ ८४ धावा करता आल्या. कर्णधार मॉर्गन (३०) वगळता कोलकाताच्या एकाही फलंदाजाला वीस धावांचा टप्पा पार करता आला नाही. फलंदाजांच्या या कामगिरीवर कर्णधार मॉर्गनने नाराजी दर्शवली.

आमचा निर्णय चुकलाच

आम्हाला या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. याची सुरुवात फलंदाजीपासून झाली. सुरुवातीलाच चार-पाच विकेट झटपट गमावल्यानंतर मोठी धावसंख्या उभारणे अवघड होते. बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला, पण आमची फलंदाजी फारच निराशाजनक होती. आम्ही त्यांच्या गोलंदाजांना आणखी चांगल्याप्रकारे खेळले पाहिजे होते. त्यातच दुसऱ्या डावात दवही पडले. त्यामुळे आमचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकलाच. आम्ही आधी गोलंदाजी केली पाहिजे होती, असे सामन्यानंतर मॉर्गन म्हणाला.

दुखापतीमुळे रसेल, नरीन संघाबाहेर 

आंद्रे रसेल आणि सुनील नरीन हे कोलकाताचे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात खेळले नाहीत. मात्र, ते लवकरच संघात पुनरागमन करतील याची मॉर्गनला खात्री आहे. रसेल आणि नरीन लवकरच फिट होतील अशी मला आशा आहे. ते दोघे आमचे प्रमुख खेळाडू आहे. त्यातच ते दोघेही अष्टपैलू असल्याने आम्हाला त्यांची फार उणीव भासत आहे. मात्र, ते लवकरच पुन्हा फिट होतील आणि संघात परत येतील, असे मॉर्गनने सांगितले.

First Published on: October 22, 2020 5:50 PM
Exit mobile version