पुढच्या वर्षी खेळाडू आयपीएल नाही, तर PSL खेळतील, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा

पुढच्या वर्षी खेळाडू आयपीएल नाही, तर PSL खेळतील, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळांपैकी एक आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच बीसीसीआयला घेरण्याचा प्रयत्न करत असतो. आयपीएल सुरू झाल्यानंतर पाकिस्तानमध्येही अशीच लीग सुरू करण्यात आली होती. परंतु पुढच्या वर्षी खेळाडू आयपीएल नाही, तर PSL खेळतील, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी केला आहे.

क्रिकइन्फोशी बोलताना रमीझ राजा म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला काही संपत्ती निर्माण करणं आवश्यक आहे. आमच्याकडे सध्या PS आणि ICC निधीशिवाय काहीही नाही. पुढील वर्षापासून सुरू होणाऱ्या मॉडेलवर चर्चा केली जात आहे. तसेच मला पुढच्या वर्षापासून लिलाव मॉडेलमध्ये बदलायचे आहे. जेव्हा पाकिस्तानमध्ये क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढेल, तेव्हा पाकिस्तानचा सन्मानही वाढेल. पीएसएल हे पाकिस्तान क्रिकेटच्या आर्थिक अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे साधन आहे. पीएसएलला लिलावाच्या मॉडेलमध्ये घेतले तर फ्रँचायझींची कमाईदेखील वाढेल आणि मग खेळाडू पीएसएल सोडून आयपीएलमध्ये कसे खेळतात ते मला बघायचे आहे, असं रमीझ राजा म्हणाले.

रमीझ राजा पुढे म्हणाले की, पुढील वर्षी पीएसएलचे सामने होम ग्राउंड आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळवले जावेत, अशी आमची इच्छा आहे. टूर्नामेंटमधून मिळणारा पैसा अफाट असेल. सध्या जी पीएसएलची संकल्पना आहे त्यामध्ये सुधारणा केली पाहीजे, अशी आमची इच्छा आहे. असं रमीझ म्हणाले.


हेही वाचा : प्रवीण दरेकरांवर झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा, प्रसाद लाड यांची गृहमंत्र्यांकडे मागणी


 

First Published on: March 15, 2022 3:02 PM
Exit mobile version