ऑल-इंग्लंड स्पर्धा घेऊन खेळाडूंच्या जीवाशी खेळ!

ऑल-इंग्लंड स्पर्धा घेऊन खेळाडूंच्या जीवाशी खेळ!

सायना नेहवालचा आरोप

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु, मागील आठवड्यात ऑल इंग्लंड स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा घेऊन प्रायोजकांनी खेळाडूंच्या जीवाशी खेळ केला, असा आरोप भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केला आहे. सायनाला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

प्रायोजकांनी खेळाडूंचे स्वास्थ्य आणि त्यांच्या भावनांपेक्षा आर्थिक फायद्याचा महत्त्व दिले असे मला वाटते. त्याशिवाय मागील आठवड्यात झालेली इंग्लंड स्पर्धा सुरु ठेवण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते, असे सायनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे असल्याने बर्‍याच खेळाडूंनी धोका पत्करून ऑल इंग्लंड स्पर्धेत भाग घेतला. सायनाला या स्पर्धेत चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे आता तिला टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. ऑल इंग्लंड संपल्यानंतर जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) आपल्या सर्व स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

First Published on: March 19, 2020 5:28 AM
Exit mobile version