Grandmaster Praggnanandhaa : जगज्जेत्या कार्लसनचा पराभव करणाऱ्या ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचं पंतप्रधानांकडून कौतुक

Grandmaster Praggnanandhaa : जगज्जेत्या कार्लसनचा पराभव करणाऱ्या ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचं पंतप्रधानांकडून कौतुक

जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करणाऱ्या भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. आर प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत मोठा उलटफेर केला. या सामन्यात प्रज्ञानंदने कार्लसनचा ३९ चालींमध्ये पराभव केला. परंतु पहिल्या फेरीच्या १५ व्या चरणात प्रज्ञानंदला रशियाच्या व्लादीस्लाव अर्तमीवने पराभूत केले. या पराभवामुळे प्रज्ञानंदला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारता आली नाही.

काय म्हणाले पीएम नरेंद्र मोदी?

ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. युवा प्रतिभावान आर प्रज्ञानंदच्या यशाने आम्हा सर्वांना आनंद झाला. त्याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनविरूद्ध मिळवलेल्या विजयाचा सार्थ अभिमान आहे. असं म्हणत मोदींनी त्याला पुढीच वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सामना हरलेला रशियाचा इयान नेपोम्नियाचची १९ गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे. २०१८ मध्ये प्रज्ञानंद १२ वर्षांचा असताना त्याने भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांचा विक्रम मोडला होता. त्याने ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता.

ग्रँडमास्टर आहे तरी कोण?

रमेशबाबू प्रज्ञानंदा हा मूळचा तामिळनाडूचा आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी त्याने १० वर्षांखालील विजेतेपद पटकावले होते.

२०१८ मध्ये प्रज्ञानंदला ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला आहे. ग्रँडमास्टर बनणारा तो जगातील पाचवा सर्वात तरूण बुद्धिबळपटू आहे. मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.

प्रज्ञानंदची मोठी बहिण वैशाली ही देखील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. २०१६ मध्ये प्रज्ञानंदने यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर होण्याचा किताबही पटकावला आहे.

२०१३ मध्ये प्रज्ञानंदने ८ वर्षांखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी एफआयडीआय मास्टरचा किताब जिंकला होता. प्रज्ञानंद ९० व्या मानांकनासह बुद्धिबळ विश्वचषक २०२१ मध्ये देखील सहभाग घेतला होता.


हेही वाचा : IND vs SL: टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दीपक चाहरनंतर सूर्यकुमार यादवही संघातून बाहेर


 

First Published on: February 23, 2022 5:46 PM
Exit mobile version