Video : स्वत:चे आयुष्य पडद्यावर पाहताना प्रवीण तांबेंच्या अश्रूंचा बांध फुटला; म्हणाले, ‘स्वप्न एकदिवस नक्कीच पूर्ण होतात’

Video : स्वत:चे आयुष्य पडद्यावर पाहताना प्रवीण तांबेंच्या अश्रूंचा बांध फुटला; म्हणाले, ‘स्वप्न एकदिवस नक्कीच पूर्ण होतात’

Video : स्वत:चे आयुष्य पडद्यावर पाहताना प्रवीण तांबेंच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाले, 'स्वप्न एकदिवस नक्कीच पूर्ण होतात'

वयाची 40 ओलांडल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे अनेक क्रिकेटर्स आपण पाहिले. पण प्रवीण तांबे याला अपवाद ठरले. वयाच्या 41 व्या वर्षी देखील प्रवीण तांबे आयपीएल खेळत होते. त्यामुळे त्यांची क्रिकेटमधील कारकीर्द अनेकांसाठी आजही प्रेरणादायी आहे. 2013 मध्ये प्रवीण तांबे आयपीएलमध्ये पदापर्ण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू होता. नुकताच याच प्रवीण तांबेंच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले. कौन प्रवीण तांबे असं या सिनेमाचे नाव आहे.

नुकतचं कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी प्रवीण तांबे यांच्या बायोपिकचे स्पेशल स्क्रिनिंग पाहिले. या स्पेशल स्क्रिनिंग वेळी प्रवीण तांबे अत्यंत भावूक झाल्याचे दिसले. चित्रपट संपल्यानंतर भाषणादरम्यान त्याच्या अश्रूंचा फुटला बांध फुटला. कंट्रोल करूनही त्याला रडू येत होते. अतिशय भावनिक असा हा क्षण होता. आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहून प्रवीण भारावून गेला होता. याचा व्हिडिओ केकेआरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सिनेमा संपल्यानंतर प्रवीण बोलण्यासाठी उठले पण त्यावेळी ते अतिशय भावूक झाले त्यामुळे त्यांना शब्द सुचत नव्हते. यावेळी थोड वेळ अश्रूंना सावरत ते म्हणाले की, “स्वप्न पाहा, कारण स्वप्न एकदिवस नक्कीच पूर्ण होतात.”

यानंतर इतर खेळाडूंनीही प्रवीण यांत्या बायोपिकवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर केआरकेचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, बऱ्याच दिवसांपासून या स्क्रिनिंगची वाट पाहत होते. हा एक अप्रतिम चित्रपट आहे. यातील गाणी खूप छान आहेत. पण शेवटी चित्रपटाने सर्वांना खूप भावूक केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

प्रवीण तांबे यांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये संधी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांना प्रथम आयपीएल आणि त्यानंतर मुंबई रणजी संघात खेळण्यासाठी स्थान मिळाले. आयुष्यात कधीही हार न मानता स्वप्नी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहिचे ही स्वप्न नक्की पूर्ण होतात अशी प्रेरणा त्यांच्या या सिनेमातून मिळतेय. प्रवीण तांबे हे केआरकेचे फिरकी गोलंदाजीचे सल्लागार आहेत.

दरम्यान त्यांच्या जीवनावर आधारित कौन प्रवीण तांबे या सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे प्रवीण तांबे यांची मुख्य भूमिका साकारत आहे.


IRCTC Navratri Special : चैत्र नवरात्रीनिमित्त भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी स्पेशल ‘Vrat Thali’


First Published on: April 2, 2022 6:49 PM
Exit mobile version