घरदेश-विदेशIRCTC Navratri Special : चैत्र नवरात्रीनिमित्त भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी स्पेशल 'Vrat Thali'

IRCTC Navratri Special : चैत्र नवरात्रीनिमित्त भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी स्पेशल ‘Vrat Thali’

Subscribe

हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सवाला विशेष महत्व असून वर्षातून दोनदा नवरात्रौत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रौत्सवात देवीच्या नऊ रुपांची भक्त आराधना करतात. अशात चैत्र नवरात्रीला आजपासून म्हणजेच 2 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या चैत्रात नवरात्रीनिमित्त भक्त देवी दुर्गा पूजा करत नऊ दिवस उपवास करतात. अशा प्रवाशांना भारतीय रेल्वेने प्रवास करताना योग्य आहार अनेकदा उपलब्ध होत नाही, यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

पण आता भारतीय रेलवे आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) 2 एप्रिलपासून रेल्वेमध्ये उपवास असणाऱ्या प्रवाश्यांसाठी स्पेशल डिश सुरु केला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासादरम्यान उपवास असणाऱ्या प्रवाशांना आता उपवासासाठी लागणारा आहार उपलब्ध होणार आहे,.

- Advertisement -

रेल्वेने 28 मार्ट रोजी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे चैत्र नवरात्री या कालावधीत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फिट राहण्यासाठी योग्य आहार ऑर्डर करू शकतात. आयआरसीटीसीने 28 मार्चपासून बुक केलेल्या तिकिटांवर फास्टिंग प्लेट हे ऑप्शन देणे सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांना हा ऑप्शन तिकिट काढतेवेळीच निवडावा लागणार आहे.

तसेच यापूर्वीच तिकीट बुक केलेले प्रवासी जे आणि उपवासाची थाळी घेऊ इच्छिता ते ई-कॅटरिंग या 1323 नंबरवर कॉल करून जेवन बुक करू शकतात. आयआरसीटीसीच्या या फास्टिंग प्लेटमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर केला जाणार नाही. तसेच यातील जेवणात साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर केला जाईल.

- Advertisement -

यासोबत फास्टिंग फूडच्या मेन्यू लिस्टमध्ये लस्सी, ताजे ज्यूस, उपवासासाठी चालणाऱ्या धान्याची भजी, भाजी आणि पूरी, फळं, चहा, दूधापासून बनवलेली मिठाई, सुख्या मेव्याची खीर आदीचा समाविष्ट आहेत. आयआरसीटीसीच्या या फास्टिंग प्लेटची 125 ते 200 रुपये असणार आहे. राजधानी, दुरंतो, शताब्दीसह 500 ट्रेन्समध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. विशेष नवरात्री प्लेटफॉर्मची सुविधा फक्त प्रवाशांसाठी उपलब्ध होईल; ही सुविधा स्टेशनवरील स्टॉल्सवर उपलब्ध होणार नाही.


राजकीय नेते बदलतील, तुम्ही कायम आहात; गेल्या काही काळात विश्वास गमावलाय; सरन्यायाधीशांनी CBI ला सुनावलं

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -