Pro Kabaddi League Final : दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डी लीग चॅम्पियन, पाटणा पायरेट्सचा 1 गुणाने पराभव

Pro Kabaddi League Final : दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डी लीग चॅम्पियन, पाटणा पायरेट्सचा 1 गुणाने पराभव

dabang delhi

नवी दिल्लीः दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीगच्या (PKL) आठव्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दिल्लीने पाटणा पायरेट्सचा 37-36 असा पराभव केला. दिल्लीने प्रथमच पीकेएल ट्रॉफी जिंकली. त्याचवेळी पाटणा पायरेट्सचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. दबंग दिल्लीच्या विजयाचे नायक नवीन कुमार आणि विजय मलिक ठरले. विजयने 14 आणि नवीनने 13 गुण मिळवले. पाटणातर्फे सचिन तन्वरने 10 आणि गुमान सिंगने 9 गुण मिळवले.

पवन सेहरावतने 24 सामन्यांत 324 रेड पॉइंट्स केले, त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रेडर म्हणून गौरविण्यात आले. पाटणा पायरेट्सचा मोहम्मद रजा याला सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा किताब मिळाला. तर पुणेरी पलटणच्या मोहित गोयतला यंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले. दबंग दिल्लीचा नवीन कुमार हा स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला.

बंगळुरूमध्ये शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात 1-1 गुणांसाठी चुरशीची लढत झाली. पाटणा पायरेट्स चौथ्यांदा प्रो कबड्डी लीगची फायनल खेळत होती, पण यावेळी त्यांना विजेतेपद मिळवण्यात यश मिळू शकले नाही. हाफ टाइमपर्यंत पाटणाने 2 गुणांची आघाडी घेतली होती. रेडर प्रशांत कुमारच्या नेतृत्वाखालील पाटणा संघाने सुरुवातीच्या हाफमध्ये चांगली कामगिरी केली आणि एका क्षणी 4 गुणांची आघाडी घेतली.

पहिल्या हाफनंतर स्कोअर 17-15 असा पाटणा पायरेट्सच्या बाजूने होता. या हाफमध्ये दोन्ही संघांनी चढाईतून 12-12 गुण मिळवले, तर टॅकलमधून 2-2 गुण मिळविले. पाटणाला सर्वबाद 2 गुण मिळाले, ज्यामुळे त्यांना पूर्वार्धात आघाडी मिळाली, त्यानंतर उत्तरार्धात काही काळ पाटणाने आघाडी कायम ठेवली, पण सामन्याची 7 मिनिटे खेळ बाकी असताना दिल्लीने 2 गुणांची आघाडी घेतली. ते पाहता दबंग दिल्लीने आपली आघाडी 4 गुणांपर्यंत वाढवली. मात्र, पाटणाच्या खेळाडूंनी पुनरागमनाची आशा सोडली नाही आणि चांगला खेळ दाखवला. मात्र, अखेरच्या क्षणी दिल्लीकडे 1 गुणांची आघाडी होती, ती निर्णायक ठरली. दिल्लीने हा सामना 37-36 असा जिंकला.

अष्टपैलू विजयने सामन्यात दिल्लीसाठी सर्वाधिक गुणांची भर घातली. त्याने एकूण 14 गुण मिळवले. त्याच्याशिवाय रेडर नवीन कुमारने 13 गुणांचे योगदान दिले. नवीन कुमारने चालू मोसमात 200 रेड पॉइंट्सही मिळवले. पाटणातर्फे रेडर सचिनने 10 आणि गुमान सिंगने 9 गुण केले.


हेही वाचाः शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणार का?, उद्धव ठाकरे म्हणतात…

First Published on: February 25, 2022 10:39 PM
Exit mobile version