घरमहाराष्ट्रशिवसेनेची स्वबळावर सत्ता येणार का?, उद्धव ठाकरे म्हणतात...

शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणार का?, उद्धव ठाकरे म्हणतात…

Subscribe

काहीही करून शिवसेनेनं आपल्यासोबत यावं, अशी भाजपची इच्छा असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना येत्या काळात पुन्हा महाविकास आघाडीबरोबर सत्ता स्थापन करणार की स्वबळावर सत्तेत येणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यालाच आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.

मुंबई: स्वबळावर सत्ता आणणं प्रत्येक पक्षप्रमुखाचं स्वप्न असलंच पाहिजे. नसेल तर त्या पदासाठी तो नालायक आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यात कुणालाही स्वबळावर सत्ता मिळेल, अशी परिस्थिती नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. गेल्या काही दिवसांपासून ईडीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे काहीही करून शिवसेनेनं आपल्यासोबत यावं, अशी भाजपची इच्छा असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना येत्या काळात पुन्हा महाविकास आघाडीबरोबर सत्ता स्थापन करणार की स्वबळावर सत्तेत येणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यालाच आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.

तर प्रत्येक गावागावात आपल्या पक्षाची शाखा असली पाहिजे

लोकसत्ता’च्या 74व्या वर्धापन दिनानिमित्ताने नरिमन पॉइंट येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावलीय, त्यावेळी ते बोलत होते. स्वबळ फक्त सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर प्रत्येक गावागावात आपल्या पक्षाची शाखा असली पाहिजे. प्रत्येक वस्तीत शिवसेना असली पाहिजे. शिवसेनेशिवाय राजकारण पुढे सरकता कामा नये, एवढी ताकद असलीच पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

केंद्र सरकार राज्यांची गळचेपी करतंय का?

विशेष म्हणजे त्यांना केंद्र सरकार राज्यांची विशेषतः महाराष्ट्राची गळचेपी करतंय का, असे विचारले असता ते म्हणाले, तसे अनुभव येत आहेत. तुम्हाला केंद्रात संधी मिळाली आहे, राज्यात आम्ही मिळवली आहे. पण त्यानंतर आम्ही जनतेची कामं थांबवली आहेत का? राज्यातल्या कोरोना काळातल्या कामांचं सर्वोच्च न्यायालयानं देखील कौतुक केलंय. त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मग भ्रष्टाचार बाहेर काढा आणि जे शोधायचं आहे ते शोधा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ईडीकडून होत असलेल्या कारवाईवर भाजपला खुले आव्हान दिलेय. पुढे ते म्हणाले, संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे ज्याचं त्यानं बघायचं असतं. 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

पुन्हा येईन असं बोलून न येणं यापेक्षा हे बरं

तुम्हाला जनतेनं लोकांची कामं करण्यासाठी सत्ता दिलीय. एकमेकांवर चिखलफेक करायची, त्याला बदनाम करायचं आणि वाट्टेल ते आरोप करायचं आणि म्हणायचं बघा आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र आहोत आणि हे कसे गटारात राहणारे आहेत हे दाखवण्याचे जे गलिच्छ प्रकार सुरू झाले आहेत. हे सुदृढ लोकशाहीसाठी हानिकारक आहे. ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीये का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला. अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का असं वाटलं नव्हतं. पुन्हा येईन असं बोलून न येणं यापेक्षा हे बरं, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलाय. शिवसैनिक मुळात गरम रक्ताचा आहे. त्यामुळे जाऊ, तिथे वॉर्मिंग होतंच. शिवसेना ग्लोबल नाही, तर नॅशनल वॉर्मिंग तरी करतच आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

- Advertisement -

वाटेल त्या पद्धतीनं सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्त्वाचा वापर होतोय तो गैर

देशही तुम्ही जिंकलात, राज्य जिंकलंत, महापालिका जिंकल्या, सोसायटी तुम्हाला हवी, ग्रामपंचायत तुम्हाला हवीय मग आम्ही काय धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला स्वाभिमानानं ताठ कण्यानं उभं राहण्यासाठी शिवसेना स्थापन केली. जेव्हा ती परिस्थिती हिंदूंवर आली तेव्हा हिंदूना सुद्धा स्वाभिमान, स्वत्व याची जाणीवर करून देण्यासाठी हिंदुत्वाचा स्वीकार केला. आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. वाटेल त्या पद्धतीनं सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्त्वाचा वापर होतोय तो गैर आहे. मधला कोरोनाचा काळ आव्हानात्मक होता. काही काळ मंत्रालयही बंद ठेवावं लागलं होतं. पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होतंय. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार. अधिवेशनातही मी जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय.


हेही वाचाः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम; एसटी विलीनीकरणाच्या अहवालावरील पुढील सुनावणी 11 मार्चला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -