क्रिकेटरचा धक्कादायक आरोप, संघात निवडीसाठी मागितल्या वेश्या!

क्रिकेटरचा धक्कादायक आरोप, संघात निवडीसाठी मागितल्या वेश्या!

राजीव शुक्ला

उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू राहुल शर्मा याने इंडियन प्रिमियर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांचा सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफी याच्यावर टीममध्ये सिलेक्शनसाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वैश्या पाठवण्याची मागणी केली, असा आरोप केला आहे. त्याचसोबत सैफी आणि राहुल यांच्यातील संभाषणाची फोन टेपदेखील समोर आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार राहुल शर्माने असाही आरोप केला होता की सैफी खेळाडूंना बनावट वयाचे प्रमाणपत्र देखील पुरवतो ज्याने ते कमी वयाच्या वयोगटाच्या सामन्यात देखील खेळू शकतील. शर्माप्रमाणेच इतरही क्रिकेटर्सने सैफीवर आरोप केले असून त्यांचे म्हणणे आहे की सैफी संघात जागा मिळवण्यासाठी लाच मागतो. तसेच उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनमध्ये कोणतेही अधिकृत पद नसताना देखील सैफीचा सिलेक्शन कमिटीत चांगलाच दबदबा आहे.

सैफीने फेटाळले सर्व आरोप

आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांचा सहाय्यक मोहम्मद अक्रमने सैफीवर करण्यात आलेले सर्व आरोप नाकारले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, “आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्लांशी माझे चांगले संबंध असल्याने माझ्यावर हे आरोप केले जात आहेत. त्याचसोबत जर मी राहुल शर्माकडे मुलींची मागणी केली, तर त्यानंतर तो संघात असता, मात्र तो संघातदेखील नव्हता. मग हे आरोप खरे कसे?” असा प्रश्नही त्याने केला आहे.

तरी संबंधित प्रकरणाची चौकशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीयू) करत असून, एसीयूचे प्रमुख अजित सिंग यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की,”आम्ही या संपूर्ण प्रकरणाची आणि फोन कॉलची तपासणी करत आहोत. जोपर्यंत आम्ही यात समाविष्ट असलेल्या सर्वांची चौकशी करत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही अंतिम निर्णयावर आम्ही पोहोचणार नाही.”

First Published on: July 19, 2018 7:27 PM
Exit mobile version