टी-२० इंटरनॅशनलमध्ये राशिदने केली विकेटची हाफ सेंच्युरी

टी-२० इंटरनॅशनलमध्ये राशिदने केली विकेटची हाफ सेंच्युरी

राशिद खान

अफगाणिस्तानविरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात तीन विकेट घेऊन अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू लेग स्पिनर राशिद खानने टी-२० फॉर्मेटमध्ये ५० विकेट घेण्याचा पल्ला गाठला. विशेष म्हणजे त्याने केवळ ३१ सामन्यात हा टप्पा गाठला. डेहराडून येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अफगानिस्तानने केलेल्या भेदक बॉलिंगमुळे अफगाणिस्तानने हा सामना ४५ रनांनी जिंकला. १९ वर्षीय राशिद खानने वयाच्या सतराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १८ ऑक्टोबर, २०१५ रोजी झिम्बॉब्वेविरुद्ध राशिदने पहिला एकदिवसीय सामना खेळला. यानंतर त्याने १ ऑक्टोबर २०१६ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला. सध्या जागतिक बॉलर्सच्या क्रमवारीत राशिदने आपले वेगळे स्थान निर्माण केले. सध्या टी-२० फॉर्मेटमध्ये राशिदचा बॉलिंगमधील इकोनोमी रेट, स्ट्राईक रेट तसेच अॅव्हरेज सर्वच टॉप क्वालिटीचे आहे. राशिद खानने आयर्लंड विरुद्ध एका टी-२० मॅचमध्ये केवळ दोन ओव्हरमध्ये तीन रन देत पाच विकेट घेतल्या आहेत.

केवळ ३१ सामन्यांत मिळवले यश

राशिद खानने ३१ सामन्यांत हे यश मिळवून टी-२० इंटरनॅशनलमध्ये मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने देखील ३१ सामन्यांत ५० विकेट घेतल्या आहेत. सर्वात कमी टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या अजंता मेंडिस याच्या नावावर आहे. त्याने केवळ २६ सामन्यांत ५० विकेटचा पल्ला गाठला.

टी-२० इंटरनॅशनलमध्ये सर्वात जलद ५० विकेट घेणारे खेळाडू

२६ मॅच – अजंता मेंडिस (श्रीलंका)

अजंता मेंडिस

३१ मॅच – इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका)  राशिद खान (अफगानिस्तान)

इम्रान ताहिर

३1 मॅच – राशिद खान (अफगानिस्तान)

राशिद खान

३५ मॅच – डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)

डेल स्टेन

३६ मॅच – उमर गुल (पाकिस्तान)

उमर गुल
First Published on: June 5, 2018 6:26 AM
Exit mobile version