धोनीची निवृत्ती एक ‘अफवा’ – रवी शास्त्री

धोनीची निवृत्ती एक ‘अफवा’ – रवी शास्त्री

प्रशिक्षक शास्त्रींचे उद्गार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत तिसरा आणि निर्णायक सामना पराभूत झाल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली मात्र विशेष म्हणजे सामन्यानंतर दरवेळी स्टंप नेणाऱ्या धोनीने यावेळी बॉल नेल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं. भारताची बॅकबोन असणाऱ्या धोनीने निवृत्ती घेतल्यास भारतीय टीमचे काय होईल अशी भीती धोनी चाहत्यांतून सोशल मीडियावर व्यक्त केली जावू लागली. धोनीने २०१४ लाही अशीच अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो आताही अशीच अचानक निवृत्ती घेतोकी काय असे अंदाज धोनी फॅन्सकडून बांधले जावू लागले. मात्र या सर्व अदांजाना खोटे पाडत भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्रीनीं खुलासा केला आहेकी धोनीने प्रशिक्षकांना इंग्लंडमधील खेळपट्टीचा अंदाज यावा म्हणून बॉल दाखवण्याठी नेला होता.

नक्की काय आहे शास्त्रींचे विधान

धोनीने सामना पराभूत झाल्यानंतर अंपायरकडून बॉल घेतला कारण त्याला बॉल संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना दाखवायचा होता. ज्याने त्यांना इंग्लंडमधील खेळपट्टीचा अंदाज येईल आणि भारत पुढच्यावेळी तिथे खेळताना चांगले प्रदर्शन करु शकेल. असे सांगत रवी शास्त्रींनी धोनीच्या निवृत्तीच्या सर्व अंदाजांना फुलस्टॉप लावला आहे.

धोनीने आतापर्यंत ३२१ एकदिवसीय सामन्यात ५१.२५ च्या सरासरीने १००४६ रन केले असून त्यात १० शतकांचा आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या वनडेत आपले १०००० रन पूर्ण करत जगातल्या ११ बॅट्समनच्या या यादीत जागा मिळवली आहे. त्याने २७३ सामन्यात ही कामगिरी केली असून सर्वात जलद गतीने १०००० धावा करणारा तो ५वा बॅट्समन ठरला आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरन २५९ , सौरव गांगुलीने २६३, रिकी पॉटिंगने २६६ तर जॅक कॅलिसने २७२ सामन्यात ही कामगिरी केली आहे.

First Published on: July 19, 2018 2:40 PM
Exit mobile version