विश्वचषकासाठी ऋषभ पंतची निवड न करणं ही भारताची चूक – रिकी पॉन्टिंग

विश्वचषकासाठी ऋषभ पंतची निवड न करणं ही भारताची चूक – रिकी पॉन्टिंग

रिकी पॉन्टिंगचे विधान

सोमवारी राजस्थान रॉयल आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीच्या ऋषभ पंतने जबरदस्त कामगिरी केली. त्याने ३६ चेंडूत ७८ धावा करत दिल्लीच्या विजयाचा झेंडा फडकवला. त्याच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार दिला गेला. यानंतर दिल्ली संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग म्हणाला की, ‘भारताने विश्वचषकासाठी ऋषभची निवड न करुन चूक केली आहे.’ ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी आयसीआयसीने भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघात ऋषभ पंतचही नाव असेल, अशी चर्चा होती. मात्र १५ जणांच्या टीममध्ये ऋषभ पंतचं नाव न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

नेमकं काय म्हणाला रिकी पॉन्टिंग

रिकी पॉन्टिंग म्हणाला की, ‘विश्वचषकासाठी ऋषभची निवड झाली म्हणून तो नाराज झाला आहे, या गोष्टीची मला जाणीव झाली आहे. मला वाटतं, भारताने खरच त्याची निवड न करुन चूक केली आहे. माझ्या मते तरी तो आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व प्रकारचे सामने खळण्यासाठी तयार झाला आहे. फिरकीपटूंच्या माऱ्याला कसा सामना करावा, यासंदर्भातील माहिती त्याला आहे.’ यापुढे पॉन्टिंग म्हणाला की, ‘ऋषभला विश्वचषकमध्ये खेळताना पाहून मला आनंद झाला असता. त्याने स्वत:ला फिट आणि निरोगी ठेवलं तर तो तीन ते चार विश्वचषक सहज खेळू शकतो.’

ऋषभने राजस्थान अगोदरही मुंबई विरुद्ध खेळताना २७ चेंडूत ७८ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऋषभचा हा आक्रमकपणा याअगोदरही आम्ही मुंबई विरुद्ध खेळताना पाहिला असल्याचे रिकी पॉन्टिंगने सांगितले.

First Published on: April 23, 2019 12:25 PM
Exit mobile version