Ind Vs Sa: तोंड बंद ठेव…आफ्रिका खेळाडूसोबत भिडण्याच्या नादात पंतने गमावली विकेट

Ind Vs Sa: तोंड बंद ठेव…आफ्रिका खेळाडूसोबत भिडण्याच्या नादात पंतने गमावली विकेट

जोहान्सबर्गमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाची मधली फळी पुन्हा एकदा ढासळली. टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतची बॅट बरीच वेळ शांत होती. मात्र, दुसऱ्या डावातही पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. एका वादामुळे त्याने आपला विकेट गमावला आहे. विकेट गमावण्याआधी ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूसोबत भिडला होता. त्या नादात पंतने विकेट गमावली आहे.

ऋषभ पंत फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. परंतु त्याआधी टीम इंडियाने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या जोडीला गमावलं होतं. या जोडीनंतर ऋषभ पंत मैदानात खेळण्यासाठी उतरला. परंतु काही वेळानंतर पंतचा दक्षिण आफ्रिकेच्या वॅन डेर डूसनसोबत वाद झाला. यामध्ये त्याने तोंड बंद ठेव आणि तिसरा बॉल टाक असं डूसनला म्हणाला. मात्र, हाउ द जोशच्या चक्करमध्ये कागिसो रबाडाच्या बॉलवर पंतने विकेट गमावला.

सुनील गावस्करांना राग अनावर

ऋषभ पंतच्या या स्वभावामुळे टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांना राग अनावर झाला. गावस्कर म्हणाले की, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये उंच शॉट लगावण्याची काहीही आवश्यकता नव्हती. नॅचरल खेळी करणं हा मुर्खपणा आहे. पंत बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या एकामागोमाग विकेट्स पडत होत्या.

दरम्यान, ऋषभ पंत मागील काही सामन्यांमध्ये खराब प्रदर्शन करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. टेस्ट चॅम्पियनशिप फायनल झाल्यापासून तो मोठ्या धावसंख्येसाठी तळमळत आहे. ऋषभ पंतने काही डावांमध्ये दुहेरी आकडा पार केला आहे.


हेही वाचा : Helicopter Crash: CDS जनरल बिपीन रावतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाडही नव्हता, अन् कटकारस्थानही नव्हते, अहवालातील कारण काय ?


 

First Published on: January 5, 2022 10:31 PM
Exit mobile version