‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’चे सामने आता प्रेक्षकांविना होणार

‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’चे सामने आता प्रेक्षकांविना होणार

'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज'चे सामने आता प्रेक्षकांविना होणार

करोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. देशात होणारे सर्वच मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. करोनाचा फटका क्रिकेट जगताला देखील बसला आहे. बांग्लादेशमध्ये होणारे आशिया इलेव्हन टी-२०चे सामने करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत. तर भारतात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेवर करोनाचे सावट आहे. येत्या १४ मार्चला आयपीएल स्पर्धेबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र, भारतात सध्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत क्रिकेट जगतातील महान खेळाडू खेळत आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, जाँटी ऱ्होड्स, हर्षल गिब्ज, मारवान आटापटू, ब्रेट ली, मुरलीधरन आदी महान खेळाडूंच्या खेळाचा आनंद प्रत्यक्षात स्टेडियमवर उपस्थित राहून क्रिडा रसिकांना या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’च्या माध्यमातून मिळत होता. दरम्यान, आता महान खेळाडूंच्या खेळाचा आनंद प्रत्यक्षात स्टेडियमवर उपस्थित राहून घेता येणार नाही. कारण करोनाचे परिणाम आता या सीरिजवर देखील झाला आहे. या मालिकेतील सर्व उर्वरित सामने हे डी. वाय. पाटील. वर प्रेक्षकांविना खेळले जाणार आहेत. यामुळे आता क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.


हेही वाचा – IND vs AUS T-20 Final : प्रेक्षकांमधल्या एकाला करोनाची लागण


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि महाराष्ट्रात आढळलेल्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’चा १४ ते २० मार्च असा तिसरा टप्पा पडणार आहे. या सीरिजमधील सर्वे सामने डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार असून तिथे कोणत्याही प्रेक्षकाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, किकेट रसिकांनी बुक माय शोवरून तिकीट बूक केली आहेत त्यांना त्यांचे पैसे ७ ते १० दिवसांमध्ये परत दिले जाणार आहेत.

 

First Published on: March 12, 2020 1:33 PM
Exit mobile version