‘हिटमॅन’ रोहित शर्माची ‘खेलरत्न’ साठी शिफारस

‘हिटमॅन’ रोहित शर्माची ‘खेलरत्न’ साठी शिफारस

रोहित शर्मा

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नावावर मोहर उमटवली असून टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा, पॅरालिम्पिक चॅम्पियन मरियप्पन थांगावेलू यांचीही शिफारस ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी केली गेली आहे.

‘खेलरत्न’ हा भारतीय नागरिकांना देण्यात येणारा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. ‘खेलरत्न’ हा भारतीय नागरिकांना देण्यात येणारा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर (१९९७-९८), एमएस धोनी (२००७) आणि विराट कोहली (२०१८) यांना याआधी हा सन्मान देण्यात आला आहे आणि आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा रोहित हा भारताचा चौथा क्रिकेटर ठरणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी १२-सदस्यीय निवड समितीने सोमवारी द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी शिफारस केली होती, तर मंगळवारी समितीने राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी नावे अंतिम केली आहेत.

 रोहित शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार

मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. मुंबईकर रोहितचा जन्म नागपूरचा, तर बालपण बोरिवलीत गेले. २००६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डिसेंबर २००९ मध्ये त्याने रणजी करंडक स्पर्धेत त्याने गुजरातविरुद्ध कारकीर्दीतील सर्वाधिक ३०९ धावा (नाबाद) केल्या होत्या. तर २ फेब्रुवारी २०२० पर्यंत, रोहित शर्माने ३६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये ३९ शतके समाविष्ट आहेत.


IPL चा तेरावा हंगाम रंगणार Dream 11 च्या टायटलखाली
First Published on: August 18, 2020 6:37 PM
Exit mobile version